पाचोरा, 29 एप्रिल : धनगर प्राध्यापक महासंघाद्वारे समाजप्रबोधन व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यानमालेला समाजातून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. धनगर प्राध्यापक महासंघाची स्थापना झाल्यानंतर सलग तिसऱ्या वर्षी गुगल मीटवर 18 एप्रिल 2023 पासून ते 26 एप्रिल 2023 पर्यंत ऑनलाईन व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते.
नऊ दिवस ऑनलाईनच्या माध्यमातून ही व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली. पहिल्या दिवशी 18 एप्रिल रोजी महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोगाचे सदस्य प्रा. लक्ष्मण हाके यांनी समाज प्रबोधनातून समाज परिवर्तन या विषयावर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी धनगर प्राध्यापक महासंघाचे अध्यक्ष प्रा. डॉ. विजय शिरसाठ हे होते. या उद्घाटनपर कार्यक्रमाचे प्रास्ताविक धनगर प्राध्यापक महासंघाचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रा. अजय गाढवे यांनी तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तथा आभार प्रदर्शन धनगर प्राध्यापक महासंघाचे सचिव प्रा. डॉ. अतुल सूर्यवंशी यांनी केले.
दि. 19 एप्रिल रोजी पटना, बिहार येथील नरेशकुमार पाल यांनी मार्गदर्शन केले. लोकर उद्योगातून धनगर समाजात अर्थिक क्रांती या विषयावर त्यांनी उपस्थितांना संबोधित केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक धनगर प्राध्यापक महासंघाचे अध्यक्ष प्रा. डॉ. विजय शिरसाठ यांनी केले. तर वक्त्यांचा परिचय, सुत्रसंचालन व आभार प्रदर्शनाचे सादरीकरण शिर्डीचे प्रा. विकास भांड यांनी केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. बी. एम. बंडगर हे होते.
दि. 20 एप्रिल रोजी अहिल्या जीवनचरित्राच्या अभ्यासक व संशोधिका दमयंती उमेकर यांनी अहिल्यादेवींच्या विचारांची आजच्या पिढीला असणारी गरज या विषयावर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. विजया पिंजारी यांनी केले. तर वक्त्यांचा परिचय, आभार व सूत्रसंचालन प्राचार्या संगीता पुंडे यांनी केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रेमाताई लव्हाळे या होत्या.
दि. 21 एप्रिल रोजी विधानपरिषद सदस्य गोपीचंद पडळकर यांनी धनगर समाजाची राजकीय पीछेहाट कारणे व मीमांसा या विषयावर उपस्थितांना संबोधित केले. यावेळी वक्त्यांचा परिचय, आभार व सूत्रसंचालन प्रा. अजय गाढवे यांनी केले. तसेच बापूसाहेब हटकर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
दि. 22 एप्रिल रोजी पद्मश्री विकास महात्मे यांनी धनगर समाज: दशा आणि दिशा या विषयावर समाज बांधवांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. श्रीपाद महात्मे यांनी केले तर वक्त्यांचा परिचय, आभार व सुत्रसंचालन पुण्याच्या प्रा. डॉ रत्नमाला वाघमोडे यांनी केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अकोल्याचे सेवानिवृत्त उपविभागीय पोलीस अधिकारी केशवराव पातोंड हे होते.
दि. 23 एप्रिल रोजी म. आहिल्यादेवी समाज प्रबोधन मंचचे धुळे जिल्हाध्यक्ष सुभाष मासुळे यांनी धनगर आरक्षण न्यायालयीन लढा: दशा आणि दिशा या विषयावर उपस्थितांना संबोधित केले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान म. आहिल्यादेवी समाज प्रबोधन मंचचे भुसावळ येथील चंद्रशेखर सोनवणे यांनी भूषविले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अहमदाबाद (गुजरात) येथून प्रा. डॉ. जगतराव धनगर यांनी केले तर वक्त्यांचा परिचय, आभार व सूत्रसंचालन प्रा. डॉ. धनराज धनगर, येवला यांनी केले.
दि. 24 एप्रिल रोजी महाराष्ट्र राज्याच्या धनगर समाज महासंघाचे मा. महामंत्री सुभाष सोनवणे यांनी ना पक्ष भेद, न शाखा भेद, ना संघटना भेद: धनगर सारा एक या विषयावर उपस्थितांना संवाद साधला. यावेळी अमळनेरच्या प्रा. सुचित्रा रत्नपारखी यांनी प्रास्ताविक तर वक्त्यांचा परिचय, आभार व सूत्रसंचालन संगमनेर येथील प्रा. रामदास सोन्नर यांनी केले. तसेच चौंडी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा मा. मंत्री अण्णासाहेब डांगे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
दि. 25 एप्रिल रोजी जेजुरी येथील लेखक व संशोधक प्रा. डॉ. अरुण कोळेकर धनगर समाजापुढील आजची आव्हाने या विषयावर भाष्य केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भुसावळच्या प्रा. भारती सोनवणे यांनी केले. वक्त्यांचा परिचय, आभार व सूत्रसंचालन छत्रपती संभाजीनगर येथील प्रा. डॉ. किशोर काळे यांनी केले. तर राज्य गुप्त वार्ता विभागात कार्यरत पोलीस निरीक्षक महेश लांडगे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
यानंतर या ऑनलाईन व्याख्यानमालेचे शेवटच्या दिवशी म्हणजे 26 एप्रिलला कंपोझिट रीजनल सेंटर, नेल्लोर (आंध्रप्रदेश) येथे डायरेक्टर म्हणून कार्यरत डॉ. राजमणी पाल यांनी राष्ट्रीय स्तरावरील समाज सक्षमीकरण या विषयावर भाष्य केले. यावेळी धनगर प्राध्यापक महासंघाचे अध्यक्ष प्रा. डॉ. विजय शिरसाठ यांनी प्रास्ताविक तर वक्त्यांचा परिचय, आभार व सूत्रसंचालन प्रा. डॉ. सुनील धनगर, पुणे यांनी केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अमेरिकेतील सतीश नंजप्पा हे होते.
यांची होती उपस्थिती –
गुगल मीटवर आयोजित या व्याख्यानमालेसाठी डॉ. श्रीपाद महात्मे, प्रा. सुभाष मासुळे, प्रा. मुकुंद वलेकर, मारुती हजारे, गजानन निळे, डॉ. धनराज धनगर, डॉ. सतीश लवटे, डॉ. किशोर काळे, प्रा. रामदास सोन्नर, प्रा. अजय गाढवे, कृषी विस्तार अधिकारी ज्ञानेश्वर मोरे, अविनाश सावळे, पवन थोटे, योगेश खरात, बबन आटोडे, प्रा. मनोज रत्नपारखी, प्रवीण चिंचोरे, राजीव हाके, प्रा. भारती सोनवणे, डॉ. अरुण कोळेकर, प्रा. दीपक पवार, डॉ. केशव तिडके, रघुनाथ मेटकरी, रोहित पांढरे, किरण मासुळे, भास्कर खेमनर, बलभीम माथेले, लक्ष्मण करपे, प्रा. संभाजी सावळे, जगदीश पाल, अनिल येडगे, अनिल गाडेकर, भाईदास पाटील, भास्कर कोल्हे, बिरू कोळेकर, दीपक माने, धनाजी कठारे, भूषण हिरे, डॉ. बापूराव बंडगर, गजानन सपकाळ, गणेश निळे, निवृत्ती हटकर, लक्ष्मण करपे, मारुती हजारे, रमेश धनवटे, संजय काटकर, संगीता पातुर्डे, तुकाराम खांडेकर, उज्वला सावळे, वामनराव मारनर, विरेश पारखे, उत्तम धनगर, सोमनाथ कोळेकर, डॉ. धनराज धनगर, डॉ. ज्ञानदेव काळे, गजानन ढोणे, डॉ. संदीप हजारे, विजया पिंजारी, विष्णुपंत गावडे, डॉ. सुभाष कारंडे, डी. के. कन्नूर, अर्चना नागे, तुकाराम खांडेकर, लक्ष्मण हाके आदींनी उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.