पाचोरा, 30 एप्रिल : पाचोरा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक 28 एप्रिलला झाली. यानंतर आज या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. तसेच यासाठी मतमोजणीला प्रारंभ झाला आहे.
पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक ही महाविकास आघाडी, शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप अशी तिरंगी झाली आहे. तीनही पॅनलच्या वतीने आपले अस्तित्व आणि प्रभाव सिद्ध करण्यासाठी जोरदार प्रयत्न करण्यात आला. यानंतर आज या निवडणुकीत कोण बाजी मारणार, हे आज स्पष्ट होणार आहे.
LIVE UPDATES :
- क्रॉस वोटिंगचा कपबशी आणि शिट्टीला बसला तोटा
- पॅनेल टु पॅनेल वोटिंगचा महाविकास आघाडीला फायदा
- अगदी काही मतांनी पडल्या जागा पडल्याची परिस्थिती
महिला मतदारसंघातून काट्याची टक्कर समोर
- अर्चना संजय पाटील (शिंदे गट) व सिंधू पंडितराव शिंदे (अमोल शिंदे गट -भाजप)
- फक्त आठ ते दहा मतदानाच्या अवतीभवती लढाई
- पाटील लखीचंद प्रकाश शिंदे गट तर परदेशी गणेश भरतसिंग मविआ यांच्यात चुरशीची लढत
पाचोरा कृउबा समितीची सत्ता महाविकास आघाडीकडे
माजी आमदार दिलीप वाघ, ठाकरे गटाच्या वैशाली सुर्यवंशी आणि काँग्रेसचे सचिन सोमवंशी यांच्या पॅनलला स्पष्ट बहुमत 9
- सोसा – 4
- हमाल – 1
- व्यापारी – 1
- ग्रा पं – 2
- ओबीसी – 1
सोसायटी मतदार संघात सर्वसाधारण 7 जागा पैकी ऐनवेळी मोठा उलटफेर
- महाविकास आघाडी – 4
- शिवसेना (शिंदे गट) – 2
- भाजप – सतिष शिंदे विजयी
- सोसायटी मतदार संघातील सर्वसाधारण उमेदवार निकाल अपडेट:
- पाचवी फेरी –
- अपडेट : वेळ – सकाळी 12:55 वाजेपर्यंत
आमदार किशोर पाटील यांच्या गटातील उमेदवार (मतांची आकडेवारी)
- गणेश पाटील – 251
- जयवंत पाटील – 216
- प्रकाश पाटील – 272
- राजेंद्र महादू – 209
अमोल शिंदे यांच्या गटातील सतीश शिंदे यांना आतापर्यंत 231 मते मिळाली आहेत.
महाविकास आघाडी उमेदवार (मतांची आकडेवारी) –
- प्रशांत पवार – 251
- शाम कांत भोसले – 212
50% मतमोजणी असून वरील उमेदवार आघाडीवर आहेत. अजूनही मतमोजणीचे कार्य सुरू आहे. त्यामुळे हा निकाल फायनल नाही.
सोसायटी मतदार संघातील सर्वसाधारण उमेदवार निकाल अपडेट : वेळ सकाळी 11:53 वाजेपर्यंत
● आमदार किशोर पाटील यांच्या गटातील 4 उमेदवार पुढे
- गणेश पाटील
- जयवंत पाटील
- नितिन पाटील
- प्रकाश पाटील
- तर अमोल शिंदे यांच्या गटातील सतीश शिंदे आघाडीवर
- महाविकास आघाडीचे प्रशांत पवार, शामकांत भोसले आघाडीवर
- मतमोजणीचे कार्य युद्धपातळीवर सुरू आहे. हा निकाल आतापर्यंत आलेल्या माहितीनुसार आहे.
- मतमोजणी प्रक्रियेत फेरबदल
- हमाल मापाडी आणि व्यापारी यांचे मतपत्रिका शॉर्टींग करून निकाल न देता, निकाल थांबवुन
- सोसायटी मतदार संघाकडे वळवला मतमोजणी मोर्चा
- आता सोसायटी मतदार संघाचे मतपत्रिका करत आहे शॉर्टींग
- पहिला व दुसरा अंतिम निकाल लांबणीवर
- सोसायटी मतदार संघाची मतपेटी तून मतपत्रिका उघडली
- शॉर्टींग सुरू
- मतपत्रिकांचे अगोदर गठ्ठे वेगवेगळे करणार
1) पॅनेल टु पॅनेल वेगवेगळे
2) क्रॉस मते वेगवेगळे
3) बाद मते वेगवेगळे
या तीन प्रकारात कामकाज होईल
- व्यापारी मतदार संघाची माहिती मागवली असता फक्त 40 ते 50 मते पॅनेल टु पॅनेल चालली. उर्वरीत सर्व मते क्रॉस झाले आहेत.
- दोघी गठ्ठे शॉर्टींग झाले असुन मतमोजणी होऊन निकाल फक्त 10 मिनिटात येण्याची शक्यता.
- व्यापारी मतदार संघाचे 2 उमेदवार निवडुकीच्या रिंगणात आहेत.
- तर शिवसेना-भाजप-रिपाई आठवले गट पीआरपी युतीचे शेतकरी विकास पॅनेलची निशाणी ही कपबशी आहे.
- आमदार किशोर पाटील यांचे पॅनेलचे व्यापारी मनोज सिसोदिया हे आघाडीवर
- शिवसेना (शिंदे गटाचे) गोविंद मोर आणि महाविकास आघाडीचे राहुल संघवी यांना सर्वात जास्त मते क्रॉस मते झाले आहेत.
- फक्त या दोघात अटीतटीची लढत दिसत आहे.
- हमाल- मापाडी मतदार संघ
- मतांचा शाॅर्टींग गठ्ठा बघुन
- समाधान हटकर विजय झाला निश्चित
- पहिली जागा महाविकास आघाडीकडे
- अंतिम घोषणा बाकी
- महाविकास आघाडीचे – एक उमेदवार राहुल संघवी पण शर्यतीत…
- क्राॅस वोटींगची मतमोजणी सुरू
- क्राॅस वोटींग जास्त
- दोघी जागेवर कपबशी ☕ आघाडीवर असल्याचे संकेत –
- अंतिम निर्णय बाकी