पाचोरा, 30 एप्रिल : पाचोरा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक 28 एप्रिलला झाली. यानंतर आज या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. यामध्ये आमदार किशोर पाटील यांच्या पॅनलने सर्वात जास्त जागा जिंकल्या. आज सकाळी पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निकालासाठी मतमोजणीला प्रारंभ झाला होता.
पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक ही महाविकास आघाडी, शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप अशी तिरंगी झाली. तीनही पॅनलच्या वतीने आपले अस्तित्व आणि प्रभाव सिद्ध करण्यासाठी जोरदार प्रयत्न करण्यात आला. यानंतर आज या निवडणुकीत कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. यामध्ये सर्वात जास्त जागा आमदार किशोर पाटील यांच्या पॅनलने जिंकल्या.
पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक निकाल : एकूण 18 जागा
☕ शिवसेना (शिंदे गट) – 09
☂️महाविकास आघाडी – 7
भाजप – 02
☕1) गणेश भिमराव पाटील
☕2) प्रकाश अमृत पाटील
☂️3) प्रशांत पवार
☂️4) मनोज महाजन
☂️5) विजय कडु पाटील
☂️6) शामकांत पाटील
7) सतिषबापु शिंदे
महिला सोसायटी सर्वसाधारण-02
☕1) पुनम प्रशांत पाटील
2) सिंधुताई पंडित शिंदे
ओबीसी सोसायटी जागा-1
☂️1) उद्धव मराठे
♦️सोसायटी एनटी जागा -1
☕ 1) लखीचंद पाटील
ग्रामपंचायत सर्वसाधारण जागा-02
☕1) सुनिल युवराज पाटील
☂️2) डॉ. निळकंठ पाटील
ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल जागा – 1
☕1) राहुल रामराव पाटील
ग्रामपंचायत एससी – जागा – 1
☕1) प्रकाश तांबे
व्यापारी मतदार संघात- जागा – 2
☕1) मनोज सिसोदिया
☂️2) राहुल संघरी
हमाल मतदार संघात
☕1) युसुफ पटेल