पाचोरा – संपूर्ण महाराष्ट्रासाठी आज अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबरला मतदान झाल्यानंतर आज 23 नोव्हेंबररोजी मतमोजणी होणार आहे आणि अवघ्या काही तासात निकालाचे चित्र स्पष्ट होणार आहे.
पाचोरा विधानसभा मतदासंघाचा विचार केला असता याठिकाणी पाचोरा शहरातील गिरड रस्त्यावरील महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंड एमआयडीसीच्या गोडाऊनमध्ये मतमोजणीला सुरुवात होणार आहे. पाचोरा मतदारसंघातील मतमोजणी ही एकूण 26 फेऱ्यांत होणार आहे. पाचोरा मतदारसंघात एकूण 12 उमेदवार रिंगणात असून एकूण 2 लाख 29 हजार 377 म्हणजेच सरासरी 68.51 टक्के मतदान होणार आहे. यामध्ये दुपारी 1 वाजेपर्यंत येथील निकालाचे चित्र स्पष्ट होणार आहे.
तसेच स्ट्राँग रुममध्ये 354 केंद्रावर इव्हीएम मशीन आणि व्हीव्हीपॅट सुरक्षित ठेवण्यात आले आहे. उमेदवारांच्या प्रतिनिधींना निरीक्षणासाठी परवानगी दिल्याने रात्रंदिवस प्रतिनिधीदेखील निगराणी करीत आहेत.
14 टेबलवर मतमोजणी –
याठिकाणी एकूण 14 टेबलवर मतमोजणी होणार असून मतमोजणीच्या 26 फेऱ्या होणार आहेत. यामध्ये सुरुवातीला टपाली मतमोजणी 8 टेबलांवर सुरू होईल. तसेच सर्व्हिस वोटर्सची मोजणी ही चार टेबलांवर करण्यात आली आहे.
कडेकोट सुरक्षा बंदोबस्त –
मतमोजणीच्या ठिकाणी गो. से. हायस्कूल असल्याने या शाळेला एक दिवस सुट्टी देण्यात आली आहे. तसेच मतमोजणीसाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले असून त्रिस्तरीय सुरक्षा कवच करण्यात आले आहे. यात बाहेर महारष्ट्र पोलीस दल, यानंतर राज्य राखील पोलीस दलाचे जवान आणि केंद्रीय राखीव दलाचे जवान तैनात करण्यात आले आहे.