ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा – विधानसभा निवडणुकीचा निकाल आता स्पष्ट झाला आहे. जळगाव जिल्ह्यातील महायुतीच्या सर्वच उमेदवारांनी विजयाकडे वाटचाल केली. यामध्ये आता नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार, पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघात महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार किशोर पाटील यांनी दणदणीत विजय मिळवला आहे.
मतमोजणीच्या एकूण 26 फेऱ्या पडल्या. यामध्ये सुरुवातीपासूनच आमदार किशोर आप्पा पाटील यांनी आघाडी घेतली होती. यामध्ये आता शेवटी किशोर आप्पा पाटील यांनी ऐतिहासिक असा विजय मिळवला आहे. आतापर्यंत या मतदारसंघात कुणीही तिसऱ्यांदा विजयी झाले नव्हते. मात्र, महायुतीचे उमेदवार आमदार किशोर आप्पा पाटील यांनी हॅट्रिक करत ऐतिहासिक असा विजय मिळवला आहे.
आमदार किशोर आप्पांचा ऐतिहासिक विजय –
आमदार किशोर आप्पा पाटील यांना सर्वाधिक 97 हजार 366 मते मिळाली. तर वैशाली सुर्यवंशी यांना 58 हजार 677 तर अमोल शिंदे यांना 58 हजार 071 इतकी मते मिळाली. दरम्यान, आमदार किशोर आप्पा पाटील यांचा 38 हजार 689 मतांनी विजय झाला. यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी भूषण अहिरे यांच्या हस्ते त्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी पाचोरा तहसिलदार विजय बनसोडे, भडगाव तहसीलदार शीतल सोलाटे, किशोर आप्पा पाटील यांचे सुपुत्र सुमित पाटील, स्वीय सहायक राजेश पाटील, प्रविण पाटील तसेच माजी नगराध्यक्ष संजय गोहिल, आदी उपस्थित होते.
हेही पाहा : Kishor Appa Patil Hattrick : ऐतिहासिक विजयानंतर आमदार किशोर आप्पा पाटील काय म्हणाले? पहिलीच मुलाखत..