• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

आमदार किशोर पाटील यांची मोठी घोषणा; म्हणाले, मी आमदार असेपर्यंत….

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
February 23, 2023
in पाचोरा
आमदार किशोर पाटील यांची मोठी घोषणा; म्हणाले, मी आमदार असेपर्यंत….

कार्यक्रमात बोलताना आमदार किशोर पाटील

पाचोरा, 23 फेब्रुवारी : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधत पाचोरा येथील अहिर सुवर्णकार मंडळाच्या वतीने मोंढाळा रोडवर असलेल्या संस्थेच्या मालकीच्या 2 एकर जागेवर नूतन अत्याधुनिक वास्तूचे भूमिपूजन नुकतेच आमदार किशोर अप्पा पाटील यांचे हस्ते संपन्न झाले. यावेळी आमदार किशोर पाटील यांनी मोठी घोषणा केली.

काय म्हणाले आमदार किशोर पाटील – 

संत नरहरी महाराजांचा निस्सीम भक्त असलेला अहिर सुवर्णकार सामाज हा सर्वांसाठी कायमच एक आदर्शवत समाज आहे. माझ्या हातूनही या समाजाची सेवा घडावी, यासाठी मी आमदार असेपर्यंत सुवर्णकार समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आणि सार्वजनिक हिताच्या विकासकामांसाठी दरवर्षी आपल्या स्थानिक विकास निधीतून 25 लाख रुपयांचा निधी देत राहील, अशी मोठी घोषणा आमदार किशोर पाटील यांनी यावेळी केली.

संत नरहरी सोनार यांचे स्मारक –

यावेळी पाचोरा नगरपालिकेच्या माध्यमातूनही सर्व सुविधा पुरवण्याचे आश्वासन त्यांनी दिले. तसेच योग्य जागा उपलब्ध झाल्यास संत नरहरी महाराज यांचे स्मारकही उभारण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही आमदार किशोर पाटील यांनी दिली.

यावेळी मंचावर समाजाचे ज्येष्ठ नेते मुरलीधर अभिमान सराफ, अहिर सुवर्णकार समाजाचे अध्यक्ष विष्णू बापू सोनार, माजी नगराध्यक्ष संजय गोहिल, माजी नगराध्यक्षा सुनीता पाटील, युवा नेते सुमित पाटील यांच्यासह रवींद्र सराफ, राजू बाळदकर, किरण सोनार, नंदकिशोर जडे, शशिकांत सोनार, जगदीश सराफ, राजेंद्र बाविस्कर, दत्तात्रय जडे, संतोष देवरे, राजेंद्र विसपुते यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमप्रसंगी आमदार किशोर पाटील आणि त्यांच्या पत्नी सुनीता पाटील.

या कार्यक्रमात आजपर्यंत अध्यक्ष व सचिव पदावर काम केलेल्या सर्वांचा सपत्नीक सत्कार आमदार किशोर आप्पा पाटील व सुनीता पाटील यांच्याहस्ते करण्यात आला. त्यात माजी अध्यक्ष मुरलीधर शेठ सराफ श्री. व सौ. वासुदेव जडे, श्री. व सौ. मनोहर सोनार, श्री. व सौ. सुरेश देवरे, श्री. व सौ. राजाराम सोनार, माजी सचिव श्री. व सौ. नंदकुमार सोनार, श्री. व सौ. मनीष बाविस्कर यांचा सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक बापू सोनार यांनी केला. यावेळी त्यांनी सोनार समाजाच्या प्रगतीच्या विषयांमध्ये वेगवेगळ्या राजकीय विचारधारेचे सर्व मंडळी, राजकीय मदभेद बाहेर ठेवत एकत्र येत असल्याचे सांगितले. तसेच समाजाच्या एकूण प्रगतीचा आढावा मांडला.

51 लाखांची घोषणा – 

तर यावेळी मयूर सराफ यांनी आपल्या परिवारातर्फे आजोबा नानासाहेब मुरलीधर अभिमान सेठ सराफ यांच्या नावाने या नूतन वास्तूसाठी 51 लाख रुपयांची देणगी जाहीर केली. तर या निर्माणाधीन वास्तूच्या संरक्षक भिंतीच्या कामासाठी आमदार किशोर आप्पा पाटील यांनी 20 लाख रुपयांचा निधी दिला आहे. यावेळी राजाराम सोनार, शेखर वानखेडे(सावदा) यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तर शेखर वानखेडे यांनी या कामासाठी 51 हजार रुपयांचा निधी जाहीर केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली जडे, मनीषा जडे यांनी केले. तर आभार राजू बाळदकर यांनी मानले. या कार्यक्रमास सर्व समाजातील मान्यवर स्त्री पुरुषांचा सहभाग होता.

कार्यक्रमासाठी बाहेरगावाहून आलेले सोनार समाजातील मान्यवरही उपस्थित होते. या कार्यक्रमाची भोजनाची व्यवस्था मुरलीधर शेठ सराफ यांच्याकडून करण्यात आली होती. या कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व सुवर्णकार समाज महिला मंडळ सर्व पदाधिकारी व मंडळ, नवयुवक मंडळ सर्व पदाधिकारी व समस्त मंडळ या सर्वांनी कार्यक्रमासाठी मेहनत घेतली. यावेळी अहिर सुवर्णकार मंडळ कार्यकारणी पदाधिकारी, अहिर सुवर्णकार नवयुवक मंडळाचे अध्यक्ष भुवनेश दुसाने, सचिव रोहित जडे, आणि समस्त कार्यकारणी सदस्य तसेच समस्त महिला मंडळ कार्यकारणी पदाधिकारी उपाध्यक्ष जयश्री पिंपळगावकर आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करा !
Share
Tags: ahir suvarnakar mandal pachoraahir suvarnakar samajahir suvarnakar samaj pachoraamol shinde pachorakishor patil mla newsmla kishor patilmla kishor patil latest news

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान ब्रीफिंगला गैरहजर; आयएएस अधिकाऱ्याचे निलंबन

मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान ब्रीफिंगला गैरहजर; आयएएस अधिकाऱ्याचे निलंबन

February 28, 2026
विधानसभेत आमदार विक्रम पाचपुते यांनी कृत्रिम फुलांच्या वापरावराचा मुद्दा केला उपस्थित अन् मुख्यमंत्र्यांनी दिले महत्वाचे आदेश

विधानसभेत आमदार विक्रम पाचपुते यांनी कृत्रिम फुलांच्या वापरावराचा मुद्दा केला उपस्थित अन् मुख्यमंत्र्यांनी दिले महत्वाचे आदेश

February 28, 2026
तरूण आत्महत्याप्रकरणी शिंदाडमध्ये ग्रामस्थांकडून तीव्र निषेध; सखोल चौकशी करून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी

तरूण आत्महत्याप्रकरणी शिंदाडमध्ये ग्रामस्थांकडून तीव्र निषेध; सखोल चौकशी करून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी

February 28, 2026
VIDEO | पाचोरा नगरपरिषदेच्या एआय व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉटचे लोकार्पण; नागरिकांना आता विविध माहिती व तक्रार निवारणबाबतची सुविधा घरबसल्या मिळणार

VIDEO | पाचोरा नगरपरिषदेच्या एआय व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉटचे लोकार्पण; नागरिकांना आता विविध माहिती व तक्रार निवारणबाबतची सुविधा घरबसल्या मिळणार

February 27, 2026
महाराष्ट्राची विकास यात्रा थांबणार नाही – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानपरिषदेत ग्वाही

महाराष्ट्राची विकास यात्रा थांबणार नाही – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानपरिषदेत ग्वाही

February 27, 2026
VIDEO | ‘दरवर्षी 10 लाख रोजगार‍ निर्मिती ते पुढील काही वर्षात महाराष्ट्र जगातील 13 वी अर्थव्यवस्था’, विधानसभेतील मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचे महत्वाचे मुद्दे

VIDEO | ‘दरवर्षी 10 लाख रोजगार‍ निर्मिती ते पुढील काही वर्षात महाराष्ट्र जगातील 13 वी अर्थव्यवस्था’, विधानसभेतील मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचे महत्वाचे मुद्दे

February 27, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page