जळगाव, 29 जुलै : जळगाव जिल्ह्यात चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच पाचोरा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पाचोऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले. दरम्यान, विविध पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यात त्यांनी एकूण 15 मोटरसायकल चोरी केल्याचे संशयित आरोपींकडून उघडकीस आले आहे. यावरून त्या आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिली.
काय आहे संपुर्ण बातमी? –
जळगाव जिल्ह्यात दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने याबाबतचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश एसपी महेश्वर रेड्डी यांनी आदेश दिले होते. यामध्ये पाचोरा तालुक्यासह जिल्ह्यातील इतर भागातून मोठ्या प्रमाणात दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले होते. या पार्श्वभूमीवर आज पाचोरा पोलिसांनी मोठी कारवाई केली.
दोन संशयित आरोपी ताब्यात –
पाचोरा उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय येरूळे यांच्या सूचनेनुसार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक पवार यांना पाचोरा शहरात दुचाकी चोर फिरत असल्याची माहिती मिळाली. दरम्यान, या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक यांच्यासह कर्मचाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकातून दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले. यानंतर संशयित आरोपी विशाल पांडुरंग पाटील (वय-26, रा. गजानन नगर, पाचोरा) आणि रवींद्र बाबुराव पाटील (वय-29 रा. गोंडगाव ता. भडगाव) या दोघांना चोरीची दुचाकी क्रमांक (एमएच 19 डीई 1810) सह पाचोरा पोलीसांनी अटक करण्यात आली.
तब्बल 15 दुचाकी केल्या जप्त –
पाचोरा पोलिसांत दोघेही संशयतांवर प्रथमच गुन्हा दाखल झाले असून या आरोपींबाबत अधिक तपास केला असता मोठी माहिती उघड झाली. या संशियतांनी यापुर्वी चोरीच्या मोटार सायकली आणून सुरक्षित लपवून ठेवण्यास दिल्याने त्या लपवून ठेवलेल्या एकूण 3,90,000/- रुपये किंमतीच्या 15 मोटार सायकली सदर आरोपीनी तपासात काढून दिल्या आहेत. त्या मोटारसायकली जप्त करण्यात आल्या असून आणखी एका व्यक्तीचे नाव यामध्ये निष्पन्न झाले आहे. दरम्यान, त्याला अटक करण्याची कार्यवाही सुरु असल्याचे माहितीही डॉ. रेड्डी यांनी दिली
यांनी केली कारवाई –
पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेडडी, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर-पवार(चाळीसगांव परिमंडळ) उप विभागीय पोलीस अधिकारी (पाचोरा) धनंजय येरुळे यांच्या आदेशाने पाचोरा पोलीस स्टेशनचे निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोकॉ राहुल शिंपी, रणजीत पाटील, श्यामकांत पाटील, योगेश पाटील, विनोद बेलदार, सचिन पवार, हरीश अहिरे आणि सुनील पाटील यांनी केली.
हेही वाचा : आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते फायर फायटींग बाईकचे लोकार्पण, काय आहे ‘या’ बुलेटची वैशिष्ट्ये आणि महत्व?