ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 25 ऑगस्ट : दोन दिवसांपूर्वी पाचोरा शहरात आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक पार पडली. या बैठकीला आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीसह प्रमुख अधिकारी, गणेश मंडळांचे पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते. शांतता समितीच्या बैठकीनंतर आज पाचोरा पोलिमसांच्या वतीने मॉक ड्रिलचे घेण्यात आली.
आगामी काळात होणारे गणेशोत्सव, ईद-ए-मिलाद आणि नवरात्री यांसारखे मोठे सण आहेत. त्यामुळे या सणांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पाचोरा पोलिस दलाच्या वतीने आज ही मॉक ड्रील घेण्यात आली. पाचोरा शहरातील एम. एम. महाविद्यालयाच्या प्रांगणावर सकाळी 11 वाजेच्या सुमारास ही मॉक ड्रील घेण्यात आली.
पाचोरा पोलीस ठाण्याचे प्रमुख राहुल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही मॉक ड्रील घेण्यात आली. आगामी काळातील सणांच्या पार्श्वभूमीवर पूर्व तयारी म्हणून प्रत्येक विभागात ही मॉक ड्रिल घेण्यात आली. आज पाचोरा विभागातील फत्तेपूर, पहूर, जामनेर, तसेच पाचोरा पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी, होमगार्ड यांच्यासमवेत एम. एम. महाविद्यालयाच्या प्रांगणात ही मॉक ड्रिल घेण्यात आल्याची माहिती पाचोरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल पवार यांनी दिली.
तसेच आगामी काळात जे सण साजरा होणार आहेत, ते शांततेत साजरा व्हावेत. अचानक जर एखादी घडली तर पोलिसांनी पूर्ण तयारीत आहेत, असा संदेश समाजकंटकांना जावा, या उद्देशाने ही मॉक ड्रील घेण्यात आली, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.