प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्काराची घोषणा करण्यात आली. यामध्ये खान्देशातील धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील बारीपाडा याठिकाणी वनसंवर्धन तसेच पर्यावरण क्षेत्रात मोलाची कामगिरी बजावणारे चैत्राम पवार यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला. या निमित्ताने सुवर्ण खान्देश लाईव्ह न्यूजने त्यांची विशेष मुलाखत घेतली. या मुलाखतीत त्यांनी मुंबई लोकलमध्ये असताना त्यांना पद्मश्री पुरस्काराबाबतचा कॉल आल्याचा अनुभव कथन आपल्या 30-35 वर्षात त्यांनी दुष्काळी गावाला पाणीदार करणारा बारीपाडा पॅटर्न कसा राबवला, वनवासी कल्याण आश्रमाची यात नेमकी कशी भूमिका राहिली याबाबत सविस्तर अशी माहिती दिली.