सुनिल माळी, प्रतिनिधी
पारोळा, 9 मार्च : महाशिवरात्रीनिमित्त पारोळा शहरातील सिद्धेश्वर महादेव मंदिरातून पालखी मिरवणूक काढण्यात आली. माजी नगराध्यक्ष गोविंद शिरोळे तसेच पारोळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या हस्ते पालखीची पूजा करून मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला.
महाशिवरात्रीनिमित्त काढण्यात आलेली ही पालखी मडके मारुती चौक, नगरपालिका चौक या मार्गे पेंढारपुरा येथील पाताळेश्वर महादेव मंदिरात आल्यानंतर तेथे विधिवत पूजा करून पुन्हा सिद्धेश्वर महादे मंदिरात येऊन पालखी मिरवणुकीचे विसर्जन करण्यात आले.
पालखी मिरवणूक सोहळ्यात माजी उपनगराध्यक्ष रेखा चौधरी, मनोज चौधरी, दिलीप चौधरी, माजी नगरसेवक अरुण चौधरी, अमोल चौधरी, आदींसह भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
हेही वाचा : पारोळा येथे पाच वाहनांवर पोलिसांची कारवाई, सव्वा लाखांचा बसला दंड, काय आहे संपूर्ण बातमी?