संदीप पाटील, प्रतिनिधी
पारोळा, 9 जुलै : जळगाव जिल्ह्यात चोरी घटनांमध्ये वाढ होत असतानाच पारोळा शहरातून मोटारसायकल चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. पारोळा येथील चोरवड रस्त्यावरील न्यू बालाजी नगरमधून एक मोटरसायकल लंपास झाल्याची घटना दिनांक 6 जुलै रोजी रात्रीच्या सुमारास घडली.
अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल –
पारोळा पोलीस ठाण्यात मोटारसायकल चोरीला गेल्याच्या प्रकरणात 8 जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पारोळा पोलीस ठाण्यात निलेश गुलाबराव पवार यांनी फिर्याद दिल्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध पोलीस स्टेशनला गुरनं 211 / 2024 मभारतीय न्याय संहीता कायदा 2023, कलम – 303 (2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पारोळा पोलीस पुढील तपास करीत आहेत.
नेमकं काय आहे प्रकरण? –
पारोळ्यातील चोरवडरोड वरील न्यू बालाजी नगर पारोळा येथील रहिवासी निलेश गुलाबराव पवार यांची ओट्यावर लावलेली होंडा शाईन कंपनीची एम. एच. 18 बीबी 4692 ही गाडी 6 जुलै रोजी रात्रीच्या सुमारास अज्ञातांनी चोरीला नेली. याबाबतची माहिती पारोळा पोलीस स्टेशनला कळविण्यात आली होती. दरम्यान, काल 8 जुलै रोजी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
हेही वाचा : Special Interview : 7 हजार 200 कोटींचा प्रकल्प; जळगाव जिल्ह्यातील सात तालुक्यांना होणार मोठा फायदा