नंदुरबार : सुरतहून आयोध्याकडे जाणाऱ्या आस्था एक्सप्रेस वर दगडफेक झाल्याचा संशय प्रवाशांनी व्यक्त केला आहे. तर तपासणीत रेल्वेवर दगडफेकीच्या कुठल्याही खुणा आढळून न आल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली.
प्रवाशांच्या तक्रारीनंतर परिसरात तपासणी केला असता झुडपांमध्ये लपून बसलेल्या एका मनोरुग्णाला रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच यानंतर प्रवाशांच्या तक्रारीनंतर नंदुरबार आरपीएफ पोलीस स्टेशनला अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे संपूर्ण घटना –
सुरतवरून अयोध्याकडे जाणाऱ्या आस्था एक्सप्रेसवर दगडफेक झाल्याची माहिती होती. मात्र, अशी कुठलीही घटना घडली नसल्याच्या रेल्वे पोलीस आणि रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. मात्र, ज्याठिकाणी घटना घडल्याची माहिती मिळाली, त्याठिकाणी संशयिताला ताब्यात घेण्यात आले. हा संशयित मनोरुग्ण असल्याने यांना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
हा मनोरुग्ण असल्याने यांच्याकडून पोलीस विभागाला व्यवस्थित माहिती देण्यात येत नाही आहे. त्यामुळे या विषयात पुढे काय तथ्य निघणार हा देखील महत्वाचे विषय जाणार आहे. मात्र, अशी कुठलीही घटना न घडल्यामुळे आजचा एक्सप्रेस रेल्वे स्थानकावरून वेळेत सुटली असून अयोध्येच्या दिशेने निघाली आहे. दरम्यान, पोलिस विभागाकडून या विषयाची चौकशी करण्यात येत आहे.