पिंपळगाव (हरेश्वर) पाचोरा, 14 ऑगस्ट : देशाच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त देशभरात विविध कार्यक्रम साजरे केले जातात. दरम्यान, स्वातंत्र्यदिनानिमित्त पिंपळगाव हरेश्वर येथे स्वातंत्र्यदिनी देशभक्तीपर गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम –
स्वातंत्र्यदिनानिमत्त पिंपळगाव पिंपळगाव (हरेश्वर) पोलीस स्टेशन व स्वरांजली गृप ऑर्केस्ट्रा (पिंपळगाव हरे व शिंदाड) यांच्या संयुक्त विद्यामाने आयोजित ‘एक शाम देश के नाम’ देशभक्तीपर गितांचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या 15 ऑगस्ट रोजी पिंपळगाव हरेश्वरच्या पोलिस ग्राऊंडवर संध्याकाळी 6 वाजता हा कार्यक्रम पार पडणार आहे.
संघपाल तायडे प्रमुख कलाकार –
पोलिस दलातील कर्मचारी व महाराष्ट्रातील लोकप्रिय गायक संघपाल तायडे हे या कार्यक्रमाचे प्रमुख कलाकार म्हणून उपस्थित असणार आहेत. तसेच गायिका म्हणून उमाताई शिवपुजे, स्वरांजली पाटील, गौरी शिवपुजे व सेजल बोरकर, बँजो वादक प्रशांत पाटील, किबोर्ड सतिष भिसे, तबला वादक सुनिल पाटील, अॅक्टोपॅड वादक अनुज पाटील, आदी स्वरांजली गृप ऑर्केस्ट्रामधील कलाकारांची उपस्थिती असणार आहे.