• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

VIDEO : पाचोऱ्यात शांतता समितीची बैठक संपन्न, आमदार किशोर आप्पा पाटील यांचे गणेशमंडळांना महत्त्वाचे आवाहन

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
August 24, 2025
in पाचोरा, ताज्या बातम्या
Peace Committee meeting concluded in Pachora, MLA Kishore Appa Patil's important appeal to Ganesh Mandals

पाचोऱ्यात शांतता समितीची बैठक संपन्न, आमदार किशोर आप्पा पाटील यांचे गणेशमंडळांना महत्त्वाचे आवाहन

ईसा तडवी, प्रतिनिधी

पाचोरा : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज पाचोरा शहरातील व्यापारी भवन येथे शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडली. गणेश मंडळांनी कमी उंचीच्या गणेश मूर्ती बसवाव्यात, असे आवाहनही यावेळी आमदार किशोर आप्पा पाटील यांनी केले.

नगरदेवळा कमान मोडावी लागली –

यावेळी बोलताना आमदार किशोर आप्पा पाटील म्हणाले की, पाचोऱ्याप्रमाणेच भडगावमध्येही मोठ्या उंचीच्या मूर्ती बसवल्या जातात. भडगाव शहरातील आझाद मित्र मंडळाच्या गणेशमूर्तीमुळे नगरदेवळा कमान मला तोडावी लागली आणि नवीन कमान बांधावी लागली, असा किस्साही आमदार किशोर आप्पा पाटील यांनी सांगितला. त्यामुळे आपल्या भावना महत्त्वाच्या आहेत. आपल्या भावना जर शुद्ध असतील तर आपल्या देव्हाऱ्यातील गणपतीही दोन इंचाचा असतो. त्यासाठी 25 फुटाचाच गणपती हवा, तेव्हाच तो पावतो, असं नाही.

मूर्ती आणताना मूर्तीचा हात, पाय तुटतो. कधी सोंड तुटते. त्यामुळे आपणच आपल्या दैवताची विटंबना करतो, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. जर धरणाला पाणी नसेल तर त्या मुर्तीचे विसर्जन तुम्ही कुठे करणार, असा सवालही त्यांनी गणेशमंडळांना करत आगामी काळात कमी उंचीची गणपतीची मूर्तीची स्थापना करावी आणि आपल्या विचारांची उंची वाढवावी, असे आवाहन आमदार किशोर आप्पा पाटील यांनी गणेशमंडळांना केले.

दरम्यान, व्यापारी भवनात झालेल्या या बैठकीला अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, पाचोरा नगरपालिकेचे मुख्याधिकारी मंगेश देवरे, तहसिलदार विजय बनसोडे, पोलीस निरीक्षक संदीप पवार तसेच पोलीस पाटील, पोलीस कर्मचारी, होमगार्ड, गणेशमंडळांचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मोठ्या संख्येने ही बैठक झाल्याबद्दल आमदार किशोर आप्पा पाटील यांनी सर्वांचे अभिनंदन करत कौतुक केले.

बातमी शेअर करा !
Share
Tags: ganeshotsavganeshotsav 2025kishor appa patilpachorapachora kishor appa patilpachora news

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सक्षम उद्योजक बनवण्यावर भर; अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे डिजिटल उपक्रम

सक्षम उद्योजक बनवण्यावर भर; अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे डिजिटल उपक्रम

April 15, 2026
तापमान वाढतंय! महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता; नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा, हवामान विभागाचा नेमका अंदाज काय?

तापमान वाढतंय! महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता; नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा, हवामान विभागाचा नेमका अंदाज काय?

April 15, 2026
संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे

संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे

April 14, 2026
झोक्यातून पडू नये म्हणून बांधलेला रुमाल ठरला जीवघेणा; दोन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, आळंदीतील घटना

झोक्यातून पडू नये म्हणून बांधलेला रुमाल ठरला जीवघेणा; दोन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, आळंदीतील घटना

April 14, 2026
जळगाव जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक ‘लखपती दीदी’, योजनेत जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी

जळगाव जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक ‘लखपती दीदी’, योजनेत जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी

April 14, 2026
मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू; अर्ज मंजुरीची प्रक्रिया कार्यालयीन अवघ्या 8 तासांत होणार पूर्ण

मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू; अर्ज मंजुरीची प्रक्रिया कार्यालयीन अवघ्या 8 तासांत होणार पूर्ण

April 14, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page