ईसा तडवी, प्रतिनिधी
पिंपळगाव (हरे.), पाचोरा, 11 फेब्रुवारी : राज्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना पाचोरा तालुक्यातून मोठी बातमी समोर आली आहे. तरूणाने 22 वर्षीय तरूणीला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यासोबत लग्न न करिता शारिरीक संबंध केले. त्याविरोधात पीडित तरूणीच्या फिर्यादीवरून पिंपळगाव (हरे.) पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, दीड महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला पोलिसांनी अटक केलीय. आकाश शांताराम ठाकरे (वय – 26 वर्ष रा. कुऱ्हाड, ता.पाचोरा) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
काय आहे संपुर्ण बातमी? –
मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड येथील आकाश शांताराम ठाकरे या तरूणाने 22 वर्षीय तरूणीला लग्नाचे आमिष दाखविले. यानंतर तिच्यासोबत लग्न न करता शारिरीक संबंध केल्याने पीडित तरूणीने पिंपळगाव पोलीस स्टेशन गाठत त्याविरोधात प्रमाणे 13 जानेवारी रोजी फिर्याद दिली होती. यानुसार, गु.र.नं. 297/2024 भा.न्या.स. कलम 69 प्रमाणे सदर आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.आरोपीस दोन दिवसांची पोलीस कोठडी –
दरम्यान, पिंपळगाव (हरे.) पोलिसांनी सदर गुन्ह्याचा तपास करत तब्बल दीड महिन्यानंतर सदर गुन्ह्यातील आरोपी आकाश ठाकरे याला अटक केली. यानंतर पोलिसांनी त्याला पाचोरा न्यायालयात हजर केले असता आरोपीस दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सरर्जेराव क्षीरसागर हे करत आहेत. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक चाळीसगाव परिमंडळ कविता नेरकर यांच्या आदेशानुसार पोलीस उपविभागीय अधिकारी धनंजय येरूळे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळगाव पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश काळे, पोलीस उपनिरीक्षक सरर्जेराव क्षीरसागर, पो.ना. राहुल बेहरे, पो.कॉ. अमोल पाटील, पो.कॉ. इम्रान पठाण यांनी सदर गुन्ह्यातील दीड महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीस अटक करण्याची कारवाई केली आहे.
हेही पाहा : IPS Dr. Maheshwar Reddy: सोशल मीडिया, क्राइम, तरुणाई; Jalgaon SP डॉ. महेश्वर रेड्डींची विशेष मुलाखत