ईसा तडवी, प्रतिनिधी
पिंपळगाव (हरे.), पाचोरा, 21 सप्टेंबर : पाचोरा तालुक्यातील कोल्हे येथील उज्ज्वला निकम यांचा अल्पवयीन मुलगा अजय निकम (वय 16) व इतर 3 मुलांना अज्ञातांनी काहीतरी अमिष दाखवून फुस लावून पळवून नेल्याची घटना 17 सप्टेंबर रोजी घडली होती. याप्रकरणी उज्ज्वला निकम यांनी पोलिस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीनुसार अज्ञाताविरोधात भारतीय न्याय संहिता कलम 137(2)अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिसांनी पुढील तपास सुर केल्यानंतर, 18 सप्टेंबर रोजी नमुद अल्पवयीन मुले हे ठाणे जिल्ह्यातील कळवा येथे असल्याबाबतची माहिती प्राप्त झाली. यानंतर त्यांना सुखरुपपणे पिंपळगाव पोलिस स्टेशनला आणून त्यांच्या आई-वडील यांना बोलवत समज देवून त्यांच्या ताब्यात देण्यात आले. दरम्यान, सदर प्रकरणातील मुलांनी मुंबई फिरण्याकरिता गेल्याचे व आम्हाला कोणीही फुस लावून पळवून नेले नव्हते, असे जबाबात सांगितले.
सदर गुन्हाचा तपास जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधिक्षक चाळीसगाव कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी पाचोरा धनंजय येरुळे, पिंपळगाव (हरे.) सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश काळे यांचे मार्गदर्शनाखाली पोहेकॉ शांतीलाल पगारे, पोहेकॉ.अरुण राजपूत, पोना राहुल बेहरे, पोकॉ.सोमनाथ दुसाने, पोकॉ.अमोल पाटील, पोकॉ.अभिजित निकम, यांनी केला आहे.
हेही पाहा : Yogendra Puranik Interview : जपानमधील मराठमोळे आमदार योगेंद्र पुराणिक यांची विशेष मुलाखत