ईसा तडवी, प्रतिनिधी
पिंपळगांव हरे. (पाचोरा), 29 जुलै : पिंपळगांव हरेश्वर पोलीस स्टेशन चे पोलीसांनी पेट्रोलींग दरम्यान चोरी केलेले पीकअप वाहन पकडले. याप्रकरणी वाहनचालकाला ताब्यात घेतले असता त्याने स्वतः हा पीकअप चोरी केली असल्याची कबुली दिलीय. दरम्यान, सदर आरोपीला पिंपळगाव पोलिसांनी ताब्यात घेत त्यावर गुन्हा दाखल केला आहे.
काय आहे संपुर्ण बातमी? –
मिळालेल्या माहितीनुसार, पिंपळगांव हरेश्वर पोलीस स्टेशन हद्दीत 27 जुलै पोलीस कर्मचारी पेट्रोलींग करत असताना पिंपळगांव हरेश्वर गांवातील माळी समाज मंगल कार्यालय येथे एक महिद्रा कंपनीची पीकअप गाडी क्र. MH 46 E 4353 ही संशयितरित्या जात असतांना दिसली. यावरून, पोलिसांनी ती गाडी थांबवत चालकास खाली उतरवुन त्यास त्याचे नाव व वाहनाचे कागदपत्र विचारली.
दरम्यान, वाहनचालकाने उडवीउडवीचे उत्तर दिल्याने सदर पिकअप सह पोलीस स्टेशनला आणुन त्यास विश्वासात घेवुन त्यास याबाबतची विचारपुस करण्यात आली. दरम्यान, त्याने ही पीकअप छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील हरसूल येथून चोरी केल्याचे सांगितले. यावरून महिद्रा कंपनीची पीकअप गाडी क्र. MH 46 E 4353 ही आरोपीकडून जप्त करण्यात आली
आरोपीविरोधात गुन्हा दाखल –
आरोपीविरोधात पिंपळगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेख अरबाज शेख जलीम, (वय 20 वर्ष, रा. छत्रपती संभाजीनगर) असे आरोपीचे नाव आहे. पुढील तपास पोहेकॉ अतुल पवार करित आहे. तसेच सदर वाहन चोरीबाबत बेगमपुरा पोलीस स्टेशन, जि. छत्रपती संभाजी नगर येथे देखील गुन्हा दाखल असुन पुढील योग्य कार्यवाही करण्यात येत आहे..
यांनी केली कारवाई –
सदरची कामगीरी जळगाव एसपी डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधिक्षक चाळीसगांव कविता नेरकर,पाचोरा उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय येरुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे सपोनि प्रकाश काळे, पोहेकॉ अतुल पवार, पोना. दिपक पाटील, पोकॉ. अमोल पाटील, पोकॉ. अभिजीत निकम यांनी केली आहे.
हेही वाचा : “तुमचे जर पैसे हवे असतील तर….”, लाडकी बहिण योजनेवरून चाळीसगावात मंत्री गुलाबराव पाटील नेमकं काय म्हणाले?