अयोध्या, 22 जानेवारी : आमचे रामलल्ला आता टेंटमध्ये नाही राहणार. आमचे रामलल्ला आता दिव्य मंदिरात राहतील. माझा पूर्ण विश्वास आहे, जे घडलेले आहे त्याची अनुभूती देशातील जगभरातील रामभक्तांना होत आहे. हा क्षण अलौकिक आहे. हा क्षण पवित्र आहे. हे वातावरण, ही ऊर्जा, ही वेळ प्रभू श्रीरामाचा आमच्या सर्वांना विश्वास आहे, असे प्रतिप्रादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. प्रभू श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त ते बोलत होते.
काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी? –
अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त उपस्थितांना संबोधित करत पंतप्रधान मोदी म्हणाले की, मी आता गर्भगृहात ईश्वरीय चेतना साक्षी बनून तुमच्यासमोर उपस्थित आहे. सांगायला खूप काही आहे. मात्र, शब्द फुटत नाहीयेत. चित्त अजूनही त्या क्षणात लीन आहे. सर्व संत एवं ऋषी गण, येथे उपस्थित आणि जगभरात आमच्यासोबत जोडले गेलेले रामभक्त सर्वांना प्रमाण. सर्वांना रामराम. आज आमचे राम आले आहे. अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर आमचे राम आले आहेत. अनेक वर्षांचे धैर्य, त्याग तपस्यानंतर आमचे प्रभू राम आले आहे. या शुभ वेळेच्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा.
शतकानुशतके संयमाचा वारसा –
पंतप्रधान मोदी म्हणाले की, राम आग नव्हे तर ऊर्जा, राम विवाद नाही राम समाधान आहे. राम आमचेच नाही तर सर्वांचेच आहेत. राम फक्त वर्तमान नाही तर अनंतकाल आहेत. अयोध्येतील प्रभू रामांची प्राणप्रतिष्ठा ही साक्षात मानवीय मूल्यांची आणि सर्वोच्च आदर्शांची प्राणप्रतिष्ठा आहे. 22 जानेवारी 2024 ही कॅलेंडरवरील तारीख नव्हे तर हे नव्या काळातील उदय आहे. राम मंदिराच्या भूमिपूजनानंतर प्रतिदिवशी प्रत्येक दिवशी देशात उत्साह वाढत होता. निर्माण कार्यपाहून देशवासियांमध्ये एक नवीन विश्वास जन्माला येत होता. आज आम्हाला शतकानुशतके संयमाचा वारसा लाभला आहे.
राष्ट्र नवइतिहासाची निर्मिती –
ते पुढे म्हणाले की, आज आम्हाला श्रीरामाचे मंदिर मिळाले आहे. गुलामीची मानसिकता तोडून जिद्दीने राष्ट्र नवइतिहासाची निर्मिती करतो. आजपासून हजार वर्षानंतरही लोक या तारखेची या क्षणाची चर्चा करतील. किती मोठी रामकृपा आहे की, आम्ही सर्वजण या क्षणाला जगत आहेत. या क्षणाला साकार होताना पाहत आहोत. ही वेळ सामान्य वेळ नाही. आम्हाला सर्वांना माहिती आहे की, ज्याठिकाणी रामाचे कार्य असते, त्याठिकाणी पवनपुत्र हनुमान निश्चितच विराजमान असतात.
आम्हाला निश्चितच क्षमा करतील –
मी हनुमान गढीला प्रणाम करतो. मी माता जानकी, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न, यांना प्रमाण करतो. शरयु, अयोध्यापुरीला प्रणाम करतो. मी यावेळी दिव्यत्वाची अनभूती करत आहे. मी आज प्रभू श्रीराम यांना क्षमायाचना मागतो. आमचा पुरूषार्थ, त्याग काहीतरी कमी राहिली, आम्ही इतके वर्ष हे कार्य करू शकलो नाही. आज ती कमी पूर्ण झाली. मला विश्वास आहे की, प्रभू श्रीराम आज आम्हाला निश्चितच क्षमा करतील.
माझ्या प्रिय देशवासियांनो, त्रेतायुगात, राम आगमानावर प्रभू विलोकी हरके पूरवासी – प्रभूचे आगमन पाहून सर्व देशवासी आनंदाने भरून गेले. वियोगाचा अंत झाला. तो काळ 14 वर्षांचा होता तरी इतका असह्य होता. मात्र, या युगात तर देश वासियांनी शेकडो वर्षांचा वियोग सहन केला. अनेक पिढ्यांनी हा वियोग सहन केला. भारताच्या संविधानात भगवान राम विराजमान आहेत. संविधान अस्तित्त्वात आल्यानंतर प्रभू श्रीरामाच्या अस्तित्वाबाबत कायदेशीर लढाई चालली. न्यायपालिकेचे आभार. जिने न्यायाची लाज राखली. न्यायाचे पर्याय, प्रभू रामाचे मंदिरही न्यायबद्ध पद्धतीनेच झाले. आज गावागावात किर्तन होत आहेत.
हेही वाचा : Ram Mandir Live Update : जय श्रीराम! अखेर, तो क्षण आलाच, प्रभू श्रीरामाचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा संपन्न