• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home देश-विदेश

PM नरेंद्र मोदींनी तोडला पंडित नेहरूंचा विक्रम; बनले सर्वाधिक काळ सेवा देणारे पंतप्रधान

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
June 10, 2026
in देश-विदेश, ताज्या बातम्या
PM नरेंद्र मोदींनी तोडला पंडित नेहरूंचा विक्रम; बनले सर्वाधिक काळ सेवा देणारे पंतप्रधान

नवी दिल्ली, 10 जून: भारताच्या राजकीय इतिहासात आज, म्हणजेच १० जून २०२६ रोजी एक मोठा विक्रम नोंदवला गेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशात सर्वाधिक काळ सलग लोकनियुक्त (निवडून आलेले) पंतप्रधानपद भूषवणारे नेते ठरले आहेत. या ऐतिहासिक कामगिरीसह त्यांनी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा ६२ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत काढला आहे.

पंतप्रधान मोदींचा ४,३९९ दिवसांचा ऐतिहासिक कार्यकाळ –

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २६ मे २०१४ रोजी पहिल्यांदा देशाच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर त्यांनी २०१४, २०१९ आणि २०२४ अशा सलग तीन लोकसभा निवडणुकांमध्ये ऐतिहासिक विजय मिळवला. आज १० जून रोजी त्यांच्या सलग कार्यकाळाचे ४,३९९ दिवस पूर्ण झाले आहेत.

दुसरीकडे, पंडित जवाहरलाल नेहरू यांचा देशातील पहिला सार्वत्रिक निवडणुकांनंतरचा (१९५२ ते १९६४) सलग लोकनियुक्त कार्यकाळ ४,३९८ दिवसांचा होता. नेहरूंचा हा ६ दशकांहून अधिक काळ अबाधित असलेला रेकॉर्ड आज पंतप्रधान मोदींनी पार केला आहे. (नेहरूंचा एकूण कार्यकाळ जरी जास्त असला, तरी त्यातला काही काळ हा निवडणुकांपूर्वीचा म्हणजेच अंतरिम सरकारचा होता).

‘एनडीए’कडून विशेष कौतुक आणि गौरव –

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या विक्रमाचे भाजप आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (NDA) मित्रपक्षांकडून मोठे स्वागत करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर आज नवी दिल्लीत एनडीएची बैक आयोजित करण्यात आली आहे. आज होणाऱ्या एनडीएच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत पंतप्रधान मोदींच्या गौरवार्थ एक विशेष अभिनंदनाचा ठराव मंजूर केला जाणार आहे.

मुख्यमंत्रिपद आणि पंतप्रधानपदाचे मिळून ९,००० हून अधिक दिवस –

नरेंद्र मोदी यांच्या नावावर आणखी एक मोठा रेकॉर्ड नोंदवला गेला आहे. गुजरातचे मुख्यमंत्री आणि देशाचे पंतप्रधान असा दोन्ही कार्यकाळ मिळून त्यांनी लोकनियुक्त सरकारांचे प्रमुख म्हणून ९,००० पेक्षा अधिक दिवस पूर्ण केले आहेत.

दरम्यान, गेल्या १२ वर्षांच्या कार्यकाळात पंतप्रधान मोदींनी डिजिटल इंडिया, पायाभूत सुविधांचा विकास, कल्याणकारी योजना आणि जागतिक स्तरावर भारताची मजबूत प्रतिमा निर्माण करण्यावर भर दिला असल्याचे दिसून येते.

हेही वाचा: महायुती सरकारचा मोठा निर्णय! मंत्रालयातील ३३ विभाग आता होणार ४५, कोणते विभाग होणार स्वतंत्र?

बातमी शेअर करा !
Share
Tags: longest-serving prime minister of indiamarathi newspandit jawaharlal nehrupm narendra modisuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

PM नरेंद्र मोदींनी तोडला पंडित नेहरूंचा विक्रम; बनले सर्वाधिक काळ सेवा देणारे पंतप्रधान

PM नरेंद्र मोदींनी तोडला पंडित नेहरूंचा विक्रम; बनले सर्वाधिक काळ सेवा देणारे पंतप्रधान

June 10, 2026
महायुती सरकारचा मोठा निर्णय! मंत्रालयातील ३३ विभाग आता होणार ४५, कोणते विभाग होणार स्वतंत्र?

महायुती सरकारचा मोठा निर्णय! मंत्रालयातील ३३ विभाग आता होणार ४५, कोणते विभाग होणार स्वतंत्र?

June 10, 2026
लोहटार येथे विशेष आरोग्य शिबिर; पंतप्रधान मातृत्व सुरक्षा अभियानांतर्गत 42 गरोदर मातांची तपासणी

लोहटार येथे विशेष आरोग्य शिबिर; पंतप्रधान मातृत्व सुरक्षा अभियानांतर्गत 42 गरोदर मातांची तपासणी

June 10, 2026
विधान परिषद जळगाव स्थानिक प्राधिकरण मतदारसंघ; निवडणुकीसाठी नियुक्त कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण संपन्न

विधान परिषद जळगाव स्थानिक प्राधिकरण मतदारसंघ; निवडणुकीसाठी नियुक्त कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण संपन्न

June 10, 2026
रावेरच्या केळी उत्पादक शेतकऱ्यांना न्याय द्या; पीक विमा, वेदर स्टेशन व पंचनाम्याबाबत आमदार अमोल जावळे यांची मुख्यमंत्री व कृषिमंत्र्यांकडे मागणी

रावेरच्या केळी उत्पादक शेतकऱ्यांना न्याय द्या; पीक विमा, वेदर स्टेशन व पंचनाम्याबाबत आमदार अमोल जावळे यांची मुख्यमंत्री व कृषिमंत्र्यांकडे मागणी

June 9, 2026
बळीराजासाठी आनंदाची बातमी! राज्यात मान्सूनचे आगमन, पुढील 48 तासांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता

बळीराजासाठी आनंदाची बातमी! राज्यात मान्सूनचे आगमन, पुढील 48 तासांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता

June 6, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page