• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर! शिर्डीत साईबाबा समाधीचं घेणार दर्शन

महाराष्ट्रातील सुमारे 7500 कोटी रुपयांच्या बहुविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन व लोकार्पण

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
October 25, 2023
in महाराष्ट्र
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर! शिर्डीत साईबाबा समाधीचं घेणार दर्शन

शिर्डी, 25 ऑक्टोबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या, 26 ऑक्टोबर 2023 रोजी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. ते उद्या अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथे भेट देणार आहेत. या भेटीत पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रथम श्री साईबाबा समाधी मंदिरात दर्शन आणि पूजा करतील. यावेळी मंदिरातील नवीन दर्शन रांग संकुलाचे उद्घाटनही ते करणार आहेत.

अकोले तालुक्यातील निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याचे जलपूजन करून निळवंडे धरण प्रकल्प देशाला समर्पित करणार आहेत. त्यानंतर शिर्डी जवळील काकडी विमानतळालगतच्या मोकळ्या मैदानात शेतकरी मेळाव्यात शेतकरी व नागरिकांशी संवाद साधणार आहेत. यावेळी आरोग्य, रेल्वे,  रस्ते, गॅस आणि तेल क्षेत्रातील सुमारे 7500 कोटी रुपयांच्या बहुविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन व लोकार्पण करून राष्ट्राला समर्पित करणार आहेत.

तीन मजली दर्शनरांग प्रकल्प –

शिर्डीत येणाऱ्या देश-विदेशातील भाविकांना सुकर आणि सुरक्षित दर्शन घेता यावे, यासाठी साई संस्थानने 109 कोटी रुपये खर्चून वातानुकूलित तीन मजली दर्शनरांग प्रकल्प तयार केला आहे. या दर्शनरांगेच्या माध्यमातून दिवसभरात एक लाख भाविकांना दर्शन घेता येणार आहे. 19 ऑक्टोबर 2018 रोजी या प्रकल्पांचे भूमिपूजन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते झाले. त्यानंतर चार वर्षात हा प्रकल्प पूर्ण करण्यात आला आहे. दर्शनरांग प्रकल्पाचे बांधकाम क्षेत्रफळ 2 लाख 61 हजार 920 चौरस फूट आहे. घडीव दगडाची वातानुकुलीन दर्शन रांग, प्रवेशासाठी 3 भव्य प्रवेशद्वार, एकाचवेळी सुमारे 45 हजार भाविकांना मौल्यवान वस्तू, मोबाईल ठेवण्यासाठी लॉकर्सची व्यवस्था, 48 बायोमेट्रिक पास काऊंटर, 20 लाडू प्रसाद काउंटर, 2 साईंची विभूती काऊंटर, 2 साईंचे कापड कोठी काऊंटर, 2 बुक स्टॉल्स, 10 देणगी कांऊटर, 06 चहा, कॉफी काउंटर व बँग स्कँनर, 25 सेक्युरिटी चेकअप सेंटर, पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर भाविकांसाठी 10 हजार क्षमतेचे 12 वातानुकूलीत हॉल, आरओ प्रक्रियेचे शुध्द पिण्याचे पाणी, प्रथमोपचार केंद्र अशी या दर्शनरांगेची वैशिष्ट्ये आहेत.

अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील निळवंडे (उर्ध्व प्रवरा प्रकल्प) धरण जिल्ह्यातील दुष्काळी व जिरायत भागाला सुजलाम् सुफलाम् करणारा प्रकल्प ठरणार आहे. डावा, उजवा, उच्चस्तरीय पाईप कालवा व उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून अकोले, संगमनेर, राहाता, श्रीरामपूर, कोपरगाव व सिन्नर (नाशिक) या तालुक्यातील 182 गावांमधील 68878 हेक्टर (1 लाख 70 हजार 200 एकर) शेतजमिन ओलिताखाली येणार आहे. सिन्नर तालुक्यातील 6 गावांमधील 2612 हेक्टर शेतजमीन वगळता अहमदनगर जिल्ह्यातील 66266 हेक्टर शेतजमीन सिंचनाखाली येणार आहे.

काकडी येथील शेतकरी मेळाव्यात ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजने’ची सुरूवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या योजनेते महाराष्ट्रातील प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 86 लाखाहून अधिक लाभार्थ्यांना दरवर्षी 6 हजार रुपयांची अतिरिक्त रक्कम देऊन त्यांना लाभ दिला जाणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना आता वर्षाला 12 हजार रूपयांची मदत मिळणार आहे. यावेळी महाराष्ट्रातील 86 लाख शेतकऱ्यांना 1712 कोटी रूपयांच्या पहिल्या हप्त्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन वितरण केले जाणार आहे.

अहमदनगर येथील आयुष हॉस्पिटलचे उद्घाटन, महिला व बाल रूग्णालयाचे भूमिपूजन, शिर्डी विमानतळाजवळ नवीन टर्मीनल बिल्डिंगचे भूमिपूजन पंतप्रधान श्री.मोदी यांच्या हस्ते होणार आहे.  कुर्डुवाडी – लातूर रोड रेल्वे विभागाचे विद्युतीकरण (186 किमी), जळगाव ते भुसावळला जोडणारा तिसरा आणि चौथा रेल्वे मार्ग (24.46 किमी); एनएच-166 (पॅकेज-1) च्या सांगली ते बोरगाव विभागाचे चौपदरीकरण; इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या मनमाड टर्मिनलवर अतिरिक्त सुविधा यांचे लोकार्पण ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधानाच्या हस्ते आयुष्मान कार्ड आणि स्वामित्व कार्डचे लाभार्थ्याना वाटप करण्यात येणार आहे.
याप्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल, पशुसंवर्धन व दूग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, राज्य मंत्रीमंडळातील इतर मंत्री, राज्यमंत्री, खासदार सदाशिवराव लोखंडे, खासदार डॉ.सुजय विखे पाटील व स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
बातमी शेअर करा !
Share
Tags: modi in maharashtramodi in shirdipm modipm narendra modi

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाचोरा पोलिसांची धडाकेबाज कारवाई; अवघ्या 3 तासांत दोन चोरीचे गुन्हे उघड, आरोपी अटकेत

पाचोरा पोलिसांची धडाकेबाज कारवाई; अवघ्या 3 तासांत दोन चोरीचे गुन्हे उघड, आरोपी अटकेत

April 17, 2026
उन्हाळ्यात पाणी व वीजपुरवठा अखंडितपणे सुरु ठेवावा; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

उन्हाळ्यात पाणी व वीजपुरवठा अखंडितपणे सुरु ठेवावा; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

April 17, 2026
‘मतदार यादी ही राजकीय आयुष्याची शिदोरी’; BLA नी जबाबदारीने काम करावे – आमदार किशोर आप्पा पाटील

‘मतदार यादी ही राजकीय आयुष्याची शिदोरी’; BLA नी जबाबदारीने काम करावे – आमदार किशोर आप्पा पाटील

April 17, 2026
पुढील चार दिवस उष्णतेची लाट कायम; राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

पुढील चार दिवस उष्णतेची लाट कायम; राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

April 17, 2026
कंत्राटी कामगारांच्या समस्यांवर तातडीने उपाययोजना करा – ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

कंत्राटी कामगारांच्या समस्यांवर तातडीने उपाययोजना करा – ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

April 17, 2026
जळगाव जिल्ह्यात 1,610 रुग्णांना सुमारे 13.33 कोटी रूपयांची वैद्यकीय मदत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून आरोग्यसेवेला गती

जळगाव जिल्ह्यात 1,610 रुग्णांना सुमारे 13.33 कोटी रूपयांची वैद्यकीय मदत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून आरोग्यसेवेला गती

April 16, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page