भुसावळ, 12 फेब्रुवारी : प्रारंभिक आंतरराष्ट्रीय मानवाधिकार एवं महिला अपराध नियंत्रण संघटन नवी दिल्ली (रजि.भारत सरकार) संघटनेचा मानवाधिकार या विषयावर विशेष मार्गदर्शनाचा कार्यक्रम काल (11 फेब्रुवारी) रोजी भुसावळ येथे पार पडला. यावेळी मानवाधिकाराविषयी नागरिकांना जागृत करण्याची गरज असल्याचे संघटनेचे संस्थापक, राष्ट्रीय अध्यक्ष दिलीप मोहिते यांनी सांगितले. यावेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना ओळखपत्र वाटप करण्यात आले.
काय आहे संपूर्ण बातमी? –
प्रारंभिक आंतरराष्ट्रीय मानवाधिकार एवं महिला अपराध नियंत्रण संघटन नवी दिल्ली (रजि.भारत सरकार) संघटनेचे भुसावळ येथे मानवाधिकार या विषयावर एकदिवसीय मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष दिलीप मोहिते हे या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते. तर संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष शशिकांत दुसाने हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमाला अॅड. राहुल वाघ तसेच संतोष जाधव यांनी मार्गदर्शन केले.

भुसावळ तालुका अध्यक्ष विनोद शर्मा आणि तालुका संघटनेतील पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमाचे भव्य असे आयोजन केले होते. यावेळी संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष दिलीप मोहिते म्हणाले की, मानवाधिकाराविषयी नागरिकांना जागृत करण्याची गरज आहे. तसेच शशिकांत दुसाने यांनी केलेल्या संघटनेच्या विस्तार कार्याविषयी त्यांनी कौतुक केले. संघटनेचे कायदेशीर सल्लागार अॅड. राहुल वाघ आणि अॅड. संतोष जाधव यांनी मानवाधिकार या विषयावर मार्गदर्शन करत विस्तारपूर्वक माहिती दिली.
संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष शशिकांत दुसाने यांनी बोलताना सांगितले की, सर्व सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी मानवाधिकार हा एक महत्वाचा पर्याय आहे. त्यासाठी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपला संघटनेचा विस्तार करणे गरजेचे आहे. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संदेश देत सर्वांनी सोबत येऊन काम केल्यास संघटनेच्या कार्याचा विस्तार केला पाहिजे, असे आवाहन दुसाने यांनी यावेळी केले.
यावेळी भुसावळ शहरातील प्रतिष्ठित उद्योगपती आणि प्रतिष्ठित नागरिकांनी उपस्थिती दिली. तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अखिलेशकुमार धिमन यांनी तर प्रास्ताविक विनोद शर्मा यांनी तर आभार जयप्रकाश शुक्ला यांनी मानले. भुसावळ तालुकाध्यक्ष विनोद शर्मा यांच्यासह तालुका जनसंपर्क अधिकारी अखिलेशकुमार धिमन, शहराध्यक्ष जयप्रकाश शुक्ला, तालुका संघटक कविता सोनवणे, शहरसंघटक तुषार सराफ, शहर महिला जनसंपर्की अधिकारी सुनिता पांडे यांनी उपस्थित राहत कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले.
यांची होती उपस्थिती –
संघटनेचे धुळे जिल्हा कायदेशीर सल्लागार अॅड. रेखा विसपुते, नांदुरा तालुकाध्यक्ष किशोर वाकोडे आणि नांदुरा तालुका पदाधिकारी, जळगाव जिल्हा संघटक नयना दुसाने आणि जळगाव जिल्हा पदाधिकारी, पाचोरा तालुका महिलाध्यक्षा मंदाकिनी पाटील, पाचोरा तालुका उपाध्यक्ष प्रकाश विसपुते, पाचोरा तालुका महिला उपाध्यक्षा किरण पाटील, पाचोरा तालुका महिला जनसंपर्क अधिकारी सुष्मा पाटील, पाचोरा तालुका महिला संघटक अनुसया राठोड, पाचोरा तालुका सहसंघटक ललिता पाटील, तसेच पाचोरा तालुका जनसंपर्क प्रमुख इसा तडवी, पाचोरा तालुका संघटना पदाधिकारी, भडगाव तालुकाध्यक्षा रत्ना पाटील आणि भडगाव तालुका संघटना पदाधिकारी, बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष धीरज अवसरमल तसेच बुलढाणा जिल्हा संघटनेतील पदाधिकारी, धरणगाव तालुकाध्यक्ष धनराज पाटील आणि धरणगाव तालुका पदाधिकारी, आदी उपस्थित होते.