काटोल (नागपूर), 24 जानेवारी – फासे पारध्यांच्या मुलांना शिक्षणाची सोय व्हावी आणि ते मुख्य प्रवाहात जोडले जावे, यासाठी मतीन भोसले यांनी अमरावती जिल्ह्यात प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रमशाळेची स्थापना केली. या आश्रमशाळेत तब्बल साडे चारशे विद्यार्थ्यी शिक्षण घेत आहे. मतिन भोसले यांच्या कार्याची दखल घेत नागपूरच्या काटोल तालुक्यातील कचारी सावंगा येथील आदर्श विद्यालयात गौरव सोहळा समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी माजी मंत्री रमेशचंद्र बंग यांच्या हस्ते मतीन भोसले यांचा सन्मापत्र देऊन सत्कार करण्यात आला. तसेच अधात्म गुरूकुल गुरूकुंज मोझरीच्या संस्थापक छाया मानव आणि रमेश बंग यांना देखील सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदर्श विद्यालय संस्थेचे अध्यक्ष शिवदयाल दुबे हे होते. तर सभापती संजय डांगोरे, राष्ट्रसंत विचार प्रचारक ज्ञानेश्वर रक्षक, प्राचार्य प्रा. मुकेश दुबे, रमेश फिस्के यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी अशोक बाभुळकर, गणेश बोलके, विजय राकस, नत्थूजी गणोरकर यांनी मरणोत्तर देहदानाचा संकल्प केला. तसेच आश्रमशाळेसाठी 21 हजार रूपये आणि गुरूकुंज मोझरीसाठी 10 हजार रूपये वर्गणी, ब्लॅकेट, खाऊ देण्यात आले. तसेच झोळी फिरवून 7 हजार 108 रूपये दान करण्यात आले.
हेही वाचा – अमरावती : चंद्रशेखर भुयार यांच्या ‘समाधी’ या गझल संग्रहाचे थाटात प्रकाशन
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशोक बाभूळकर यांनी केले. तर सुत्रसंचालक प्रा. वैशाली खडकोदकर यांनी केले. यावेळी मान्यवरांनी आपले विचार मांडले. आदर्श विद्यालय कचारी सावंगा, गाडगेबाबा पतसंस्था काटोल, गाडगेबाबा व राष्ट्रसंत विचार मंच आणि जाम कॅपिटल ग्रुप कचारी सावंगा यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते.