चाळीसगाव, 11 जुलै : चाळीसगाव शहरातील शाळा, महाविद्यालय, क्लासेस बसस्टँड, परिसरात गर्दीच्या ठिकाणी विनाकारण फिरणारे टवाळखोर, हुल्लडबाजी, रोडरोमिओवर प्रतिबंधक होण्यासाठी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनच्यवतीने दामिनी पथकाची स्थापना करण्यात आली आहे.
टवाळखोरांना पोलिसांनी समज देऊन सोडले –
या पार्श्वभूमीवर चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीत दामिनी पथकाकडून प्रतिबंधक कारवाई करण्यात आली. यामध्ये महाविद्यालय परिसरात जनजागृतीसाठी आलेल्या पथकाने 7 टवाळखोरांना ताब्यात घेत पोलीस स्टेशनला आणले. यानंतर त्यांना समज देवून सोडुन दिले. दामिनी पथकात चाळीसगांव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक योगेश माळी, महिला पोहेकाँ. अनिता सुरवाडे, पोकॉ. राहुल सोनवणे यांचा सामावेश आहे.
दामिनी पथकाद्वारे कारवाई –
जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी मा. विनायक कोते पोलीस निरीक्षक अमितकुमार मनेळ यांच्या मार्गदशनाखाली दामिनी पथाकाची स्थापन करत चाळीसगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा उपक्रम राबविला जातोय.
दामिनी पथकाला संपर्क करण्याचे आवाहन –
चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनच्यावतीने स्थापन करण्यात आलेल्या दामिनी पथकाने शहरातील रावी कॉलेज हिरापूर रोड, बस स्टॅन्ड, के. आर कोतकर कॉलेज, भडगांव रोड, नवजीवन क्सासेस, येथे भेटी देवुन शाळेतील शिक्षक वृंद, विद्यार्थी व विद्यार्थीनी यांना रोडरोमिओकडुन कोणत्याही प्रकारे त्रास होणार नाही, गुड टच बँड टच क्युआर कोडवर तक्रार करणे तसेच डायल 112 बाबत मार्गदर्शन करुन मुलींची छेडखानी केल्यास किंवा अन्य त्रास देण्या-या इसमांबाबत पोलीस स्टेशन किंवा दामिनी पथकाला संपर्क करण्याचे आवाहन केले. दरम्यान, दामिनी पथकाच्या स्थापनेमुळे महिला तसेच विद्यार्थीनीमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण झाले असून पालकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
हेही वाचा : पांदण रस्त्यांची रुंदी १२ फूट अनिवार्य; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची मोठी घोषणा, नेमकं काय म्हणाले?