सोलापूर, 19 जानेवारी : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते कामगारांसाठी बांधण्यात आलेल्या घरकुलांचे लोकार्पण करण्यात आले. असंघटित आणि विडी कामगारांसाठी 350 एकर परिसर, 834 इमारती, 30 हजार फ्लॅट्स ही देशातील सर्वात मोठी कामगार वसाहत आहे, असे म्हणत असताना पंतप्रधान मोदी भावनिक झाल्याचे पाहायला मिळाले.
काय म्हणाले नरेंद्र मोदी? –
घरकुलांचे लोकार्पण करत असताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज 1 लाखांपेक्षा जास्त परिवाराचा गृह प्रवेश होईल. माझा आनंद वाढणार की नाही? सर्वजण आपल्या घरात राम ज्योती प्रजवलीत करणार की नाही? आम्ही जो संकल्प केला होता तो आज पूर्ण होतोय. देशातील सर्वात मोठ्या सोसायटीचे लोकापर्ण झाले. मला पण लहानपणी अशा घरात रहायला मिळायला हवं होतं, असे म्हणत मोदींचा कंठ दाठला आणि मोदी भावनाविवश झाले. मोदींच्या या भाषणाने उपस्थित लोकही भावूक झाले होतो.
ते पुढे म्हणाले की, आपल्या घराची चावी देण्यासाठी मी स्वतः आलो आहे. आज मोदींनी एक गॅरंटी पूर्ण केली. मोदींची गॅरंटी म्हणजे गॅरंटी पूर्ण होण्याची गॅरंटी होय. पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणाची सुरूवात ही मराठीतून केली. यावेळी उपस्थित असलेल्यांनी जोरदार टाळ्यांचा गडगडाट केला. मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी कुंभारी येथील रे नगरात 15 हजार कामगारांना घरांचे वाटप झाले. मंचावर राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले? –
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, “मी कालच दाओसवरून परतलो. दाओसमध्ये 3 लाख 53 हजार करोडच्या करारांवर सह्या झाल्या. मला तिथे अनेक जण भेटले पण सर्वांच्या मुखी फक्त एकच नाव होते ते म्हणजे मोदीजींचे. अनेक उद्योगपती तिथे आले होते. त्यांना गॅरंटी आहे मोदीजी पुन्हा एकदा देशात सत्ता स्थापन करणार आहेत. आमच्या राज्यात देखील डबल इंजिन सरकार बनणार आहे”, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
हेही वाचा : मोठी बातमी! 16 वर्षांखालील मुलांची शिकवणी होणार बंद, शिक्षण मंत्रालयाची ‘ही’ आहेत नवीन मार्गदर्शक तत्वे