जळगाव, 7 ऑगस्ट : पुणे-नागपूर (अजनी) मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस सुरू होणार आहे. याबाबतची मंजुरी रेल्वे बोर्डाने दिली असून 10 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे-नागपूर ‘वंदे भारत’ एक्स्प्रेसला ऑनलाईन पद्धतीने हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमास भुसावळ स्टेशन येथे होणार असून केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यावेळी उपस्थित राहणार आहे.
केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसेंचा पाठपुरावा –
मुंबई – नागपूर किंवा पुणे – नागपूर दरम्यान वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्यावर अनेक दिवसांपासून जिल्ह्यातील प्रवाशांची मागणी होती, त्यानुसार केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यंनी रेल्वे मंत्री यांची भेट घेऊन तसेच पत्र व्यवहार करून अनेकवेळा मागणी केली होती. आता सदर मागणी यश आले असून, येणाऱ्या रविवार पासून पुणे-नागपूर (अजनी) मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस धावणार आहे.
पुणे ते नागपूरचा प्रवास अवघ्या 12 तासांत –
वंदे भारत एक्स्प्रेस मुळे अवघ्या 12 तासांत पुणे ते नागपूर चा प्रवास होणार आहे. ही गाडी या मार्गावरील सर्वांत वेगवान रेल्वे ठरणार आहे. सध्या पुणे-नागपूर मार्गावर हावडा-दुरांतो एक्स्प्रेस ही सर्वांत जलद रेल्वे आहे. पुणे ते नागपूर अंतर कापण्यासाठी दुरांतोला 12 तास 55 मिनिटे वेळ लागतो. ‘वंदे भारत’ ला त्याहून एक तास कमी वेळ लागणार आहे.
‘वंदे भारत’चे वेळापत्रक –
- पुणे स्टेशन येथून सकाळी 6 वाजून 25 मिनिटांनी सुटेल,
- नागपूर (अंजनी) स्टेशन येथे सायंकाळी 6 वाजून 25 मिनिटांनी पोचेल.
- नागपूर (अंजनी) स्टेशन येथून सकाळी 9 वाजून 50 मिनिटांनी सुटेल,
- पुणे स्टेशन येथे रात्री 9 वाजून 50 मिनिटांनी पोचेल.
- तर दौड कॉर्डलाइन, अहिल्यानगर, कोपरगाव, मनमाड, जळगाव, भुसावळ, अकोला, बडनेरा व वर्धा या स्टेशनवर सदर वंदे भारत एक्स्प्रेस ला थांबा असणार आहे.
- नागपूर (अंजनी)-पुणे 26102 ‘वंदे भारत’ एक्स्प्रेस भुसावळ येथे दुपारी 2.55 वा तर जळगाव येथे दुपारी 3.26 वाजता पोहचेल.
- पुणे-नागपूर (अंजनी) 26101 ‘वंदे भारत’ एक्स्प्रेस जळगाव येथे दुपारी 12.35 वा तर भुसावळ येथे दुपारी 01.05 वा पोहोचणार आहे.