• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home देश-विदेश

पेलेट गन हल्ला प्रकरण; राहुल गांधींचे दिल्लीत आंदोलन अन् अखेर दिल्ली पोलिसांकडून एफआयआर दाखल करण्याची तयारी

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
August 21, 2026
in देश-विदेश, ताज्या बातम्या
पेलेट गन हल्ला प्रकरण; राहुल गांधींचे दिल्लीत आंदोलन अन् अखेर दिल्ली पोलिसांकडून एफआयआर दाखल करण्याची तयारी

नवी दिल्ली, 21 ऑगस्ट: जंतर मंतरवरील विद्यार्थी आंदोलनादरम्यान पेलेट गनच्या हल्ल्यात जखमी झालेल्या विद्यार्थ्याला न्याय मिळावा, या मागणीसाठी काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी आज 21 ऑगस्ट रोजी शुक्रवारी दिल्लीतील पार्लमेंट स्ट्रीट पोलीस ठाण्याबाहेर धरणे आंदोलन केले. या प्रकरणात एफआयआर दाखल करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. सुमारे पाच तासांच्या आंदोलनानंतर दिल्ली पोलिसांनी राहुल गांधी यांची मागणी मान्य करत एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली.

राहुल गांधी यांनी आंदोलनादरम्यान पोलिसांच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. शांततेने आंदोलन करणाऱ्या तरुणांवर पेलेट गनचा वापर केला जातो, मात्र त्यांना न्याय मिळत नाही, अशी टीका त्यांनी केली. जोपर्यंत एफआयआर दाखल होत नाही आणि दोषींवर कठोर कारवाईची खात्री मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली होती.

जखमी विद्यार्थ्यासोबत राहुल गांधी यांनी तब्बल पाच ते साडेपाच तास आंदोलन केले. अखेर पोलिसांनी एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केल्याने त्यांच्या मागणीला यश आले. या प्रकरणात न्याय मिळवणे हेच आपले ध्येय असल्याचे राहुल गांधी यांनी स्पष्ट केले.

20 जुलै रोजी विद्यार्थी आंदोलकांवर पेलेट गनचा वापर –

20 जुलै 2026 रोजी नवी दिल्लीतील संसदेवर मोर्चा काढणाऱ्या विद्यार्थी आंदोलकांवर रॅपिड ॲक्शन फोर्सकडून (RAF) पेलेट गनचा वापर करण्यात आल्याचा आरोप आहे. या घटनेत साहिल लोचव याच्यासह काही विद्यार्थी जखमी झाले होते. वैद्यकीय अहवालानुसार, साहिलच्या शरीरात 200 हून अधिक छर्रे घुसले असून त्याच्या डोळ्यातही तीन छर्रे लागल्याचे सांगण्यात आले.

या घटनेनंतर राहुल गांधी यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. जखमी विद्यार्थ्याला न्याय मिळावा आणि संबंधितांवर कारवाई व्हावी, यासाठी त्यांनी पार्लमेंट स्ट्रीट पोलीस ठाण्याबाहेर धरणे आंदोलन केले. अखेर दिल्ली पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरुद्ध एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

हेही वाचा: पाण्याचा वाहून जाणारा प्रत्येक थेंब अडवा; जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील

बातमी शेअर करा !
Share
Tags: firmarathi newspellet gun attack caserahul gandhi protestsuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आठवीऐवजी दहावीपर्यंत पोषण आहार?, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रस्ताव सादर करण्याचे दिले निर्देश

आठवीऐवजी दहावीपर्यंत पोषण आहार?, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रस्ताव सादर करण्याचे दिले निर्देश

October 7, 2026
Chopda News: चोपड्यात जीवामृत, वर्मी कंपोस्ट व दशपर्णी निर्मितीचे प्रशिक्षण संपन्न

Chopda News: चोपड्यात जीवामृत, वर्मी कंपोस्ट व दशपर्णी निर्मितीचे प्रशिक्षण संपन्न

October 7, 2026
कुपनलिकेची 7/12 वर नोंद करण्यासाठी तलाठ्याने घेतली लाच; जळगाव ACB ने पकडले रंगेहाथ

कुपनलिकेची 7/12 वर नोंद करण्यासाठी तलाठ्याने घेतली लाच; जळगाव ACB ने पकडले रंगेहाथ

October 7, 2026
मुख्यमंत्री सहायता निधीसाठी आमदार सुरेश दामु भोळे (राजूमामा) यांच्याकडून 2 लाखांचा धनादेश सुपूर्द

मुख्यमंत्री सहायता निधीसाठी आमदार सुरेश दामु भोळे (राजूमामा) यांच्याकडून 2 लाखांचा धनादेश सुपूर्द

October 7, 2026
आदिवासी महिलांना उद्योजकतेची दिशा! सेवा संकल्प अभियानाअंतर्गत पार पडला महिला बचत गटांचा मेळावा

आदिवासी महिलांना उद्योजकतेची दिशा! सेवा संकल्प अभियानाअंतर्गत पार पडला महिला बचत गटांचा मेळावा

October 6, 2026
एरंडोल येथील डीडीएसपी महाविद्यालयात नवीन मतदार नोंदणीला सुरुवात

एरंडोल येथील डीडीएसपी महाविद्यालयात नवीन मतदार नोंदणीला सुरुवात

October 6, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page