येत्या 14 डिसेंबरला दिग्गज चित्रपट निर्माते आणि अभिनेते राज कपूर यांची 100 वी जयंती आहे. या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी कपूर कुटुंबातील सदस्यांशी विशेष संवाद साधला. यावेळी राज कपूर यांच्या कन्या रीमा कपूर तसेच कपूर कुटुंबातालील सदस्य अभिनेत्री नीतू कपूर, करिना कपूर, करिश्मा कपूर, आलिया भट्ट, रिद्धीमा कपूर, अभिनेता सैफ आली खान, रणबीर कपूर आदी उपस्थित होते. यावेळी राज कपूर यांच्या आठवणींना उजाळा देत विविध विषयांवर चर्चा रंगली. याबाबतची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर दिली.