• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

Breaking : ‘आमच्या वादापेक्षा महाराष्ट्र मोठा!’ राज ठाकरेंचं मोठं वक्तव्य; उद्धव ठाकरेंना युतीसाठी टाळी देणार का?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
April 19, 2025
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या, ब्रेकिंग
Breaking : ‘आमच्या वादापेक्षा महाराष्ट्र मोठा!’ राज ठाकरेंचं मोठं वक्तव्य; उद्धव ठाकरेंना युतीसाठी टाळी देणार का?

मुंबई, 19 एप्रिल : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीत भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला तर विधानसभा निवडणुकीत स्वबळावर निवडणूक लढवली. दरम्यान, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या आधी राज ठाकरेंची भूमिका नेमकी काय असणार? याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात असतानाच मोठी बातमी समोर आली आहे. राज ठाकरेंनी अभिनेते महेश मांजरेकर यांना दिलेल्या मुलाखतीत त्यांनी उद्धव ठाकरेंबाबतच्या वादावर वक्तव्य केल्याने ते उध्दव ठाकरेंना टाळी देणार का? असा देखील सवाल आता उपस्थित झालाय.

राज ठाकरे काय म्हणाले? –
राज ठाकरेंनी दिलेल्या मुलाखतीत शिवसेना आणि तुमची पुन्हा युती होऊ शकते का? असा प्रश्न महेश मांजरेकरांनी विचारला होता. यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले की, कुठलीही मोठी गोष्ट डोळ्यासमोर ठेवली तर आमच्यातील वाद खूप किरकोळ आहे. खरंतर, आमच्या वादापेक्षा महाराष्ट्र खूप मोठा आहे. या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी तसेच मराठी माणसाच्या अस्तित्वावासाठी आमच्यातील वाद आणि बाकी सगळ्या गोष्टी क्षुल्लक आहेत.

सर्व मराठी नेत्यांनी एकत्र येऊन एकच पक्ष काढावा – राज ठाकरे
म्हणून एकत्र येणं किंवा एकत्र राहणं, या गोष्टी कठीण नाहीत. दरम्यान, प्रश्न फक्त इच्छेचा आहे, असेही राज म्हणाले. राज ठाकरे पुढे म्हणाले की, एकत्र येणे हे कठीण नसून आपण महाराष्ट्रासाठी लार्जर पिक्चर पाहणे गरजेचे आहे आणि ते मी पाहतच आहे. मात्र, माझे तर म्हणणे आहे की, महाराष्ट्रातील सगळ्या राजकीय पक्षातील सर्व मराठी नेत्यांनी एकत्र येऊन एकच पक्ष काढावा.

राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना युतीसाठी प्रस्ताव? –
शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर माझा विचार होता की आपण बाळासाहेब सोडून कोणाच्या हाताखाली काम करायचे नाही. पण शिवसेनेत असताना मला उद्धवसोबत काम करायला काही प्रॉब्लेम नव्हता. मात्र, मी त्यांच्याबरोबर काम करावं, अशी समोरच्याची इच्छा आहे का?” असा सवाल यावेळी राज ठाकरेंनी विचारला.

दरम्यान, महेश मांजरेकरांनी “महाराष्ट्राची तशी इच्छा आहे” असे म्हटल्याने” आमची युती व्हावी, अशी महाराष्ट्राची इच्छा असेल तर महाराष्ट्राने त्यांना (उद्धव ठाकरेंना) जाऊन सांगावं तसे, असे उत्तर दिले. दरम्यान, राज ठाकरेंच्या या मुलाखतीमुळे उद्धव ठाकरेंना युतीसाठी टाळी दिली का असा सवाल उपस्थित केला जात आहे.

हेही वाचा : “…..तर पंचाईतही होईल, पण आता कोर्ट ठरवेल!” खडसेंना नोटीस दिल्यानंतर मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?

बातमी शेअर करा !
Share
Tags: mahesh manjrekarmarathi newsraj thackerayraj thackeray on uddhav thackeraysuvarna khandesh liveuddhav thackeray

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान ब्रीफिंगला गैरहजर; आयएएस अधिकाऱ्याचे निलंबन

मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान ब्रीफिंगला गैरहजर; आयएएस अधिकाऱ्याचे निलंबन

February 28, 2026
विधानसभेत आमदार विक्रम पाचपुते यांनी कृत्रिम फुलांच्या वापरावराचा मुद्दा केला उपस्थित अन् मुख्यमंत्र्यांनी दिले महत्वाचे आदेश

विधानसभेत आमदार विक्रम पाचपुते यांनी कृत्रिम फुलांच्या वापरावराचा मुद्दा केला उपस्थित अन् मुख्यमंत्र्यांनी दिले महत्वाचे आदेश

February 28, 2026
तरूण आत्महत्याप्रकरणी शिंदाडमध्ये ग्रामस्थांकडून तीव्र निषेध; सखोल चौकशी करून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी

तरूण आत्महत्याप्रकरणी शिंदाडमध्ये ग्रामस्थांकडून तीव्र निषेध; सखोल चौकशी करून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी

February 28, 2026
VIDEO | पाचोरा नगरपरिषदेच्या एआय व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉटचे लोकार्पण; नागरिकांना आता विविध माहिती व तक्रार निवारणबाबतची सुविधा घरबसल्या मिळणार

VIDEO | पाचोरा नगरपरिषदेच्या एआय व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉटचे लोकार्पण; नागरिकांना आता विविध माहिती व तक्रार निवारणबाबतची सुविधा घरबसल्या मिळणार

February 27, 2026
महाराष्ट्राची विकास यात्रा थांबणार नाही – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानपरिषदेत ग्वाही

महाराष्ट्राची विकास यात्रा थांबणार नाही – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानपरिषदेत ग्वाही

February 27, 2026
VIDEO | ‘दरवर्षी 10 लाख रोजगार‍ निर्मिती ते पुढील काही वर्षात महाराष्ट्र जगातील 13 वी अर्थव्यवस्था’, विधानसभेतील मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचे महत्वाचे मुद्दे

VIDEO | ‘दरवर्षी 10 लाख रोजगार‍ निर्मिती ते पुढील काही वर्षात महाराष्ट्र जगातील 13 वी अर्थव्यवस्था’, विधानसभेतील मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचे महत्वाचे मुद्दे

February 27, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page