• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

घरकुल योजनांना जिल्ह्यात 84 हजारांहून अधिक मंजुरी; उद्दिष्ट वेळेत पूर्ण करण्यासाठी कामांना गती द्या – रक्षा खडसे

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
February 14, 2025
in जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
घरकुल योजनांना जिल्ह्यात 84 हजारांहून अधिक मंजुरी; उद्दिष्ट वेळेत पूर्ण करण्यासाठी कामांना गती द्या – रक्षा खडसे

जळगाव, 14 फेब्रुवारी : जळगाव जिल्ह्यास एकूण 90 हजार नवीन घरकुलांचे उद्दिष्ट देण्यात आले असून, आतापर्यंत 84,600 घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे. दिलेले उद्दिष्ट वेळेत पूर्ण व्हावे, यासाठी संबंधित यंत्रणांनी शबरी, रमाई, पंतप्रधान आणि मोदी आवास या चारही घरकुल योजनांच्या कामांना गती द्यावी, असे निर्देश केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्री रक्षा खडसे यांनी दिले. तसेच, या योजनांमधील पात्र लाभार्थी वंचित राहू नयेत, यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश वस्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी दिले.

जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, वन विभाग आणि इतर संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांची विकास कामांबाबत नियोजन विभागाच्या सभागृहात बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजीव लोखंडे, वन विभागाचे उपवनसंरक्षक (वन्यजीव) जमीर शेख, जळगाव वन विभागाचे उपवनसंरक्षक प्रवीण ए.,जिल्हा शल्य चिकित्सक किरण पाटील तसेच उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

15 जूनपूर्वी पात्र लाभार्थ्यांना घरे देण्याचे उद्दिष्ट –
शासनाने मागील आणि विद्यमान घरकुल योजनांसह एकूण 1,60,000 ग्रामीण घरकुलांचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. 15 जूनपूर्वी ही घरे पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या 100 दिवसांच्या कृती आराखड्यानुसार, घरकुल योजना प्राधान्याने पूर्ण करावी, असे निर्देश केंद्रीय मंत्री श्रीमती खडसे यांनी दिले.

जिल्ह्यात 21 हजार लाभार्थ्यांना जागा उपलब्ध –
घरकुल योजनांसाठी पात्र असलेल्या, पण स्वतःच्या मालकीची जागा नसलेल्या 21,000 लाभार्थ्यांना जिल्हा प्रशासनाने शासकीय नियमानुसार जागा उपलब्ध करून दिल्याची माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.

वस्रोद्योग मंत्र्यांकडून ‘पेसा’ गाव सर्वेक्षणाचे कौतुक –
कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या समाजकार्य विभागाच्या सहकार्याने जिल्हा प्रशासनाने ‘पेसा’ अंतर्गत आदिवासी गावांतील सोयी-सुविधांचे सर्वेक्षण केले. यात पक्की व कच्ची घरे, पाणीपुरवठा (कूपनलिका व सार्वजनिक विहिरी), साक्षरता, शिक्षण, आरोग्य सुविधा आदी घटकांचा समावेश होता. या सर्वेक्षणामुळे गावागावातील सोयी-सुविधांची स्पष्टता मिळाली. वस्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.

यावल येथे ग्रामीण रुग्णालय; चोपड्यात आयुष रुग्णालय –
यावल येथे ग्रामीण रुग्णालयासाठी आठवडाभरात जागा उपलब्ध करून देण्याचे आणि चोपडा येथे आयुष रुग्णालय उभारण्यासाठी तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश केंद्रीय मंत्री श्रीमती खडसे यांनी दिले. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनीही उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांना तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले.

सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन –
आदिवासी विभागाच्या 3,000 हेक्टर जमिनीवर सेंद्रिय मिरची लागवड करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनी अजूनही नैसर्गिक असल्याने त्यांना सेंद्रिय शेतीसाठी प्रोत्साहन द्यावे. विशेषतः भाजीपाल्याला चांगला दर मिळू शकतो, यासाठी शासनानेही प्रयत्न करावेत, असे आवाहन श्रीमती खडसे यांनी केले.

Video : “मोदी-शहांनी त्यांना भारतरत्न द्यावा; आमचा आक्षेप फक्त…”; संजय राऊतांचा एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा पलटवार

बातमी शेअर करा !
Share
Tags: ias ayush prasadjalgaon newsmarathi newsraksha khadsesanjay sawakaresuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाचोरा येथे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या भव्य निर्धार मेळाव्याचे आयोजन

पाचोरा येथे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या भव्य निर्धार मेळाव्याचे आयोजन

June 27, 2025
“Thackerey is the Brand!” हिंदी सक्तीच्याविरोधातील मोर्चात ठाकरे बंधू एकत्र येणार; संजय राऊतांच्या ‘एक्स’ पोस्टनं वातावरण तापलं!

“Thackerey is the Brand!” हिंदी सक्तीच्याविरोधातील मोर्चात ठाकरे बंधू एकत्र येणार; संजय राऊतांच्या ‘एक्स’ पोस्टनं वातावरण तापलं!

June 27, 2025
धुळे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळांतर्गातील सुरक्षा रक्षकांच्या वेतनात वाढ देण्याची मागणी; कामगार मंत्र्यांना मंत्रालयात निवदेन

धुळे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळांतर्गातील सुरक्षा रक्षकांच्या वेतनात वाढ देण्याची मागणी; कामगार मंत्र्यांना मंत्रालयात निवदेन

June 27, 2025
पाचोरा तालुक्यातील सातगाव डोंगरी येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत शालेय साहित्याचे वाटप

पाचोरा तालुक्यातील सातगाव डोंगरी येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत शालेय साहित्याचे वाटप

June 27, 2025
मराठी भाषा अनिवार्य; हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

मराठी भाषा अनिवार्य; हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

June 26, 2025
जळगाव जिल्हा परिषदेत राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त सामाजिक न्याय दिन साजरा

जळगाव जिल्हा परिषदेत राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त सामाजिक न्याय दिन साजरा

June 26, 2025
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page