रावेर, 27 जानेवारी : रावेरमधील अली किड्स प्रीस्कूलमध्ये 76 वा प्रजासत्ताक दिन काल रविवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रजासत्ताक दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांवर नृत्य केले.
प्रजासत्ताक दिनानिमित्त अली किड्स प्रीस्कूल स्कूलमध्ये प्राचार्य सय्यद अन्वर अली यांनी ध्वजारोहण केले. तसेच मुलांनी विविध देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. शाळेतील मुलांनी देशभक्तीपर गीते, कविता आणि नृत्य सादर केले. शाळेतील शिक्षिका आफरीन फातिमा यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रध्वजाचे महत्त्व सांगितले आणि मुलांना देशभक्तांच्या जीवनाची जाणीव करून देण्यात आली.
दरम्यान, सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. शाळेचे सदस्य सय्यद विकार अली यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवले. जिथे सर्व मुलांनी त्यांच्या राज्याची लोकसंख्या, तिची भाषा, लोकनृत्य, नद्या आणि इतर गोष्टींबद्दल माहिती दिली. सांस्कृतिक कार्यक्रमात त्यांच्या संबंधित राज्यांचे लोकनृत्य देखील सादर करण्यात आले. प्रजासत्ताक दिनी शालेय मुलांनी देशभक्तीपर सादरीकरणाद्वारे देशातील शहीदांना आदरांजली वाहण्यात आली. सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये महाराष्ट्रातील लावणी नृत्य सादर करण्यात आले.
यावेळी प्रजासत्तादिनानिमित्त बाहेरून आलेल्या पाहुण्यांनी मुलांच्या सादरीकरणाचे कौतुक केले आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांना प्रजासत्ताक दिनाची माहिती मिळाल्याचे सांगितले. शाळेतील शिक्षकांनीही खूप मेहनत घेतली. या कार्यक्रमात अस्लम मणियार, मोहसीन शेख, शफीक शेख, शाहरुख खान, इस्माईल खान, अन्वर काझी, सलीम काझी, युनूस शेख, तन्वीर खाटीक, अमजद खान, सय्यद शोएब, साबीर खान, आदी उपस्थित होते.