जळगाव, 7 मे : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या पाचोरा आगार व्यवस्थापकांवर मनमानी कारभाराचा आरोप करत त्यांच्याविरोधात कारवाईसाठी विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांनी निवेदन देण्यात आले आहे. यासोबतच पाचोरा आगाराची 7 वाजून 15 मिनिटांनी सुटणारी पाचोरा-कुऱ्हाड, लोहारा मोहाडी मार्गे जळगाव जाणारी तसेच जळगाव आगारातून सांयकाळी 5 वाजता सुटणार जळगाव, नेरी, मोहाडी मार्गे लोहारा पाचोरा एस.टी.बस पुर्ववत सुरू करावी, अशी मागणी या निवदेनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. कुमावत बेलदार समाजसेवा संघाचे पाचोरा अध्यक्ष शांताराम उर्फ अण्णा बेलदार यांनी हे निवदेन दिले आहे.
निवदेनात म्हटल्याप्रमाणे, लोहारा गावाची लोकसंख्या 15 ते 20 हजार असुन, लोहारा ता.पाचोरा येथुन जळगावला जाण्यासाठी शाळेचे विद्यार्थी, जेष्ठ नागरिक तसेच प्रवाशांना सकाळी पाचोरा आगारातुन 7.15 वाजता सुटणारी व लोहारा ता.पाचोरा येथे सकाळी 8.15 ला पोहचणारी एस.टी.बस व परतिच्या प्रवासासाठी सांयकाळी जळगांव आगारातुन 5 वाजता सुटणारी जळगांव, लोहारा पाचोरा या मार्गावर बस सेवा सुमारे 8 दिवसांपासुन पाचोरा आगार प्रमुख प्रकाश वंजी पाटील यांच्या मनमानी कारभारामुळे सदर बस सेवा बंद करण्यात आलेल्या आहेत.
दरम्यान, बससेवा बंद केल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. तसेच खासगी वाहनांतून अवैध प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणात केली जात असून अव्वाच्या सव्वा भाडे आकारली जातेय. याप्रकरणी पाचोरा आगार व्यवस्थापक यांच्याकडे याबाबत विचारणा केली असता त्यांनी मनामानी करत असमाधानकारक उत्तरे दिली.
यामुळे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या पाचोरा आगार व्यवस्थापकांच्या मनमानी कारभाला आळा बसला पाहिजे. तसेच पाचोरा आगाराची पाचोरा-कुऱ्हाड, लोहारा मोहाडी मार्गे जळगाव जाणारी तसेच जळगाव आगारातून सांयकाळी 5 वाजता सुटणारी जळगाव, नेरी, मोहाडी मार्गे लोहारा पाचोरा एस.टी.बस पुर्ववत सुरू करावी, अशी मागणी या निवदेनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. दरम्यान, निवदेनाची दखल न घेतल्यास आंदोलनाचा पवित्रा घेतला जाईल आणि भविष्यात होणाऱ्या परिणामास पाचोरा आगार व्यवस्थापक प्रकाश वंजी पाटील हेच सर्वस्वी जबाबदार राहतील असा इशारा शांताराम बेलदार यांनी दिलाय.