जळगाव, 12 सप्टेंबर : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी समोर आली आहे. राज्यातील जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले असून जळगाव जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण आरक्षित असणार आहे. तर धुळ्यात नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) आणि नंदुरबारमध्ये अनुसुचित जमातीच्या उमेदवारासाठी अध्यक्षपद असणार आहे.
जळगाव जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण उमेदवारासाठी आरक्षित –
महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभागाने मा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार (दि. ६ मे २०२५) नव्या अधिसूचनेद्वारे राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदांच्या आरक्षणाचे नवे वाटप घोषित केले आहे. यानुसार, जळगाव जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी सर्वसाधारण उमेदवारासाठी आरक्षित करण्यात आले आहे.
महाराष्ट्रात जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदांचं आरक्षण जाहीर –
-
- ठाणे – सर्वसाधारण (महिला)
- पालघर – अनुसुसूचित जमाती
- रायगड- सर्वसाधारण
- रत्नागिरी – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
- सिंधुदुर्ग – सर्वसाधारण
- नाशिक – सर्वसाधारण
- धुळे – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
- नंदूरबार – अनुसूचित जमाती
- जळगांव – सर्वसाधारण
- अहिल्यानगर – अनुसूचित जमाती (महिला)
- पुणे – सर्वसाधारण
- सातारा – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
- सांगली – सर्वसाधारण (महिला)
- सोलापूर – नागरिकांचा मागास प्रवर्ग
- कोल्हापूर- सर्वसाधारण (महिला)
- छत्रपती संभाजीनगर – सर्वसाधारण
- जालना – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
- बीड – अनुसूचित जाती (महिला)
- हिंगोली -अनुसूचित जाती
- नांदेड – नागरिकांचा मागास प्रवर्ग
- धाराशिव – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
- लातूर – सर्वसाधारण (महिला)
- अमरावती – सर्वसाधारण (महिला)
- अकोला – अनुसूचित जमाती (महिला)
- परभणी – अनुसूचित जाती
- वाशिम – अनुसूचित जमाती (महिला)
- बुलढाणा – सर्वसाधारण
- यवतमाळ – सर्वसाधारण
- नागपूर – नागरिकांचा मागास प्रवर्ग
- वर्धा – अनुसूचित जाती
- भंडारा – नागरिकांचा मागास प्रवर्ग
- गोंदिया – सर्वसाधारण (महिला)
- चंद्रपूर – अनुसूचित जाती (महिला)
- गडचिरोली – सर्वसाधारण (महिला)<
हेही वाचा : Video | सी. पी. राधाकृष्णन यांनी उपराष्ट्रपती पदाची घेतली शपथ, पहा व्हिडिओ…