ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 8 जुलै : पाचोरा तालुक्यातील 100 ग्रामपंचायतच्या सरपंच आरक्षणाची सोडत आज 8 जुलै रोजी शहरातील कै. तात्यासाहेब आर. ओ. पाटील व्यापारी भवनात सकाळी 11 वाजता काढण्यात आले. तहसीलदार विजय बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करण्यात आले. यानंतर दुपारी उपविभागीय अधिकारी भूषण अहिरे यांच्या अध्यक्षतेखाली महिलांसाठी आरक्षण (SC/ST/OBC व सर्वसाधारण गटातील महिला) निश्चित करण्यात आले.
दरम्यान, सरपंच पदासाठी पुन्हा नव्याने आरक्षण जाहीर झाल्यानुसार खालीलप्रमाणे पाचोरा तालुक्यातील 100 गावांतील ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण राहणार आहे.