ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा : शहरातील तहसिल कार्यालयात तहसील पाचोरा व तहसील भडगाव यांचा एकत्रितपणे “महसूल दिन” साजरा करण्यात आला. उपविभागीय अधिकारी पाचोरा यांच्या अध्यक्षतेखाली काल शुक्रवारी 4 वाजेच्या सुमारास हा कार्यक्रम साजरा करण्यात आला.
कार्यक्रमास उपविभागीय अधिकारी पाचोरा भूषण अहिरे, तहसीलदार पाचोरा विजय बनसोडे, तसेच तहसीलदार भडगाव शितल सोलाट, मा. जिल्हा परिषद सदस्य मधुभाऊ काटे, मा. जिल्हा परिषद सदस्य पदमबापू पाटील व लोहारा सरपंच अक्षय कुमार जयस्वाल, सर्व नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, सहाय्यक महसूल अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, महसूल सहाय्यक, पोलीस पाटील, शिपाई, महसूल सेवक, वाहन चालक, असे दोन्ही तालुक्याचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
या कार्यक्रमाची सुरुवात राज्य गीताने करण्यात आली. त्यानंतर दोन्ही तालुक्यातील उत्कृष्ट नायब तहसीलदार, सहाय्यक महसूल अधिकारी, मंडळ अधिकारी, सहाय्यक महसूल अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, महसूल सहाय्यक, वाहन चालक, महसूल सेवक, शिपाई व मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षक यांना सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर सेवानिवृत्त झालेले कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी महसूल दिनानिमित्त सर्व उपस्थित अधिकारी कर्मचारी व नागरिक यांच्याशी संवाद साधून त्यांना तसेच विविध लाभार्थी यांचे लाभमंजुरीचे पत्र देण्यात आले. सदर कार्यक्रमात तहसीलदार पाचोरा यांनी कार्यक्रमाविषयी माहिती दिली त्याचप्रमाणे जिल्हा परिषद सदस्य मधुभाऊ काटे यांनी सदर कार्यक्रमाबाबत शुभेच्छा देत आपले विचार मांडले. तसेच उपविभागीय अधिकारी यांनी अध्यक्षीय भाषण केले. या कार्यक्रमाची प्रस्तावना आर. डी. पाटील, मंडळ अधिकारी पाचोरा यांनी मांडली. सूत्रसंचालन भाऊसाहेब लोखंडे यांनी केले. तर आभार बागुल आप्पा यांनी मानले. या कार्यक्रमास पाचोरा व भडगाव तालुक्यातील 80 ते 90 कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते.