मुंबई, 5 जुलै : सुर्याने आधी जसं सांगितलं की, हा कॅच हातात बसला. मात्र, जर सुर्याने हा कॅच घेतला नसता तर त्याला घरी बसवलं असतं, अशी गंमतीशीर प्रतिक्रिया रोहित शर्मा याने व्यक्त केली. राज्य विधिमंडाळात आयोजित केलेल्या सन्मान सोहळ्यात रोहित शर्माने आपल्या भावना व्यक्त केल्या. विश्वचषक भारतात आणणे हे खुप मोठं स्वप्न होतं. तब्बल 11 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर आम्ही हा विश्वचषक जिंकलाय. यामध्ये संपुर्ण भारतीय संघाचा योगदान असल्याचेही रोहित शर्मा म्हणाला.
रोहित शर्मासह महाराष्ट्रातील खेळाडूंचा सन्मान –
टी-20 विश्वचषकावर नाव कोरल्यानंतर टीम इंडियाचे काल मुंबईत लाखो क्रिकेट चाहत्यांच्या उपस्थितीत ऐतिहासिक स्वागत करण्यात आले. यानंतर आज विधिमंडळात महाराष्ट्र शासनाच्यावतीने विश्वविजेत्या कर्णधार रोहित शर्मासह महाराष्ट्रातील सूर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि यशस्वी जैयस्वाल या चौघ खेळाडूंचा सन्मान करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अजित पवार, विधानपरिषद उपसभापती निलम गोऱ्हे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, क्रीडामंत्री संजय बोनसोडे यांच्यासह आमदारांची उपस्थित होती.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? –
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या भावना व्यक्त करताना सांगितले की, विश्वविजेत्या टीम इंडियाच्या सर्वांचे मी मनापासून अभिनंदन करतो. भारतीय संघातील खेळाडुंनी उत्कृष्ट खेळ करत विश्वचषकावर भारताचे नाव कोरले. सुर्या यांच्या बाबतीत सांगायचे झाले तर सुर्यकुमार यादव हे ज्याप्रकारे ते बॅटिंग करतात टीम अडचणीत असताना सेंच्युरी मारणे हे सर्वात महत्वाचे आहे. तुमचे श्रम तसेच सराव होता म्हणून तुम्ही तो कॅच पकडू शकलात. खरंतर असा हा कॅच की बॉउन्ड्रीच्या बाहेरून आत फेकायचा आणि आत फेकल्यानंतर तो पुन्हा पकडायचा. खरंतर, सुर्या यांनी अशक्य असं काम त्या कॅचच्या माध्यमातून केले असल्याच्या भावना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी शिवम दुबे तसेच यशस्वी जैयसवाल यांच्यासह भारतीय संघाचे यावेळी कौतुक केले.
मुंबईत मोठं स्टेडियम उभारावे –
मुंबईला वानखेडे स्टेडियमपेक्षा मोठ्या स्टेडियमची आवश्यकता आहे. त्यामुळे मोठं स्टेडियम उभारण्यासाठी आम्ही जी मदत लागली ती करायला तयार आहोत. खरंतर वानखेडे स्टेडियमची सर कोणतंच स्टेडियम करू शकत नाही. ते ऐतिहासिक आहे. मात्र, मुंबईत एक लाखांपेक्षा अधिक लोक मावतील अशा स्टेडियमची गरज असून येत्या काळात ते आपण सर्व मिळून तयार करावे, अशी अपेक्षा फडणवीसांनी व्यक्त केली.
आज आम्ही सगळे एकत्रित आहोत. सगळ्यांच्या चेहऱ्यावर एकच भाव आहे, तो म्हणजे आपला भारत जिंकलाय आणि तुम्ही तो जिंकवलाय. म्हणून टीम इंडियाकरिता स्टॅडिंग ओव्हेशन द्यावे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगताच संपुर्ण सभागृहीतील उपस्थितांनी टीम इंडियाचे उभे राहुन अभिवादन करत मोठ्मोठ्या आवाजात भारत माता की जय….भारतीय संघाचा…. रोहित शर्माच… विजय असो..अशा घोषणा केल्या. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर तसेच विधानपरिषद सदस्या नीलम गोऱ्हे यांनी देखील टीम इंडियाचे अभिवादन करत आपल्या भावना व्यक्त केल्या.
हेही वाचा : स्मार्ट प्रीपेड मीटरबाबत देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा, म्हणाले, ‘सामान्य ग्राहकांना…’