ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 7 जून : राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षा (NEET) ही भारतातील सर्वात स्पर्धात्मक परीक्षा असून डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांना या परिक्षेत पास होणे, अत्यंत महत्वाचे मानले जाते. ही परिक्षा उत्तीर्ण झाल्याशिवाय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळू शकत नाही. दरम्यान, पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड येथील सर्वसामान्य शेतकरी पुत्राने नीट परीक्षेत 647 गुण मिळवत नीट परिक्षेत यश संपादन केले आहे. सचिन प्रल्हाद चौधरी असे त्याचे नाव आहे.
कुऱ्हाडच्या सचिनने केली नीट परीक्षा उत्तीर्ण –
पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड येथील प्रल्हाद विठ्ठल चौधरी यांचे चिरंजीव सचिन प्रल्हाद चौधरी याला 720 पैकी 647 गुण मिळाले आहेत. आईवडिलांच्या कष्टाची जाणीव ठेऊन त्याने जिद्दीने हे यश मिळवले आहे.त्याने त्याचे प्राथमिक 7 वी पर्यंतचे शिक्षण जि. प. मराठी मुलांची शाळा लोहरा येथून पूर्ण केले. यानंतर त्याचे 10 पर्यंतचे शिक्षण कुऱ्हाड येथे पुर्ण झाले.
सचिनने आई-वडिलांना शेतीत मदत करत डॉक्टर होण्याचे स्वप्न बघून जिद्दीने मेहनत सुरू केली. आणि नीट परिक्षेत यश मिळवले. यासाठी त्याला त्याचे आईवडील, शिक्षक, मामा डॉ.महेंद्र शहादू गीते यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. दरम्यान, सचिनच्या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
हेही वाचा : Smita Wagh : विजयानंतर स्मिता वाघ Special Interview