• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

Success Story : विदेशात शिक्षण अन् क्रीडा क्षेत्रातही भरारी, सामनेरची कन्या मिताली वाणी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराने सन्मानित

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
April 28, 2025
in महाराष्ट्र, करिअर, खान्देश, जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या, पाचोरा
Samner's daughter Mithali Vani honored with the Shiv Chhatrapati State Sports Award.know her success story

Success Story : विदेशात शिक्षण अन् क्रीडा क्षेत्रातही भरारी, सामनेरची कन्या मिताली वाणी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराने सन्मानित

चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी

पुणे/सामनेर (जळगाव) : मेहनत आणि जिद्द असेल तर आयुष्यात काहीच अशक्य नाही, हे एका तरुणीने सिद्ध करुन दाखवले आहे. मिताली मिलिंद वाणी असे या तरुणीचे नाव आहे. तिचा जन्म पुण्यात झाला असून तिच्या वडिलांचे मूळ गाव हे जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील सामनेर हे आहे.

मिताली मिलिंद वाणी या तरुणीचा वुशू या खेळ प्रकारात सन 2020-21 या वर्षाचा सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरव करत महाराष्ट्र शासनाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत तिला शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या निमित्ताने सुवर्ण खान्देश लाईव्ह न्यूजच्या टीमने तिचा आतापर्यंतचा हा प्रवास जाणून घेतला.

मितालीचे शालेय शिक्षण हे पुण्यातच सेंट हेलेना व एसएसआरवीएम याठिकाणी झाले. त्यानंतर तिने पुणे विद्यापीठातून बीकॉमची पदवी घेतली. शालेय शिक्षणादरम्यानच तिला वुशू खेळाची आवड निर्माण झाली. तिला तिचे कोच सोपान कटके यांचे मार्गदर्शन लाभले. सहावीत असताना पासूनच ती हा खेळ खेळू लागली.

2018 मध्ये तिने पहिल्यांदा आंतराष्ट्रीय स्तरावर पोलंडमध्ये झालेल्या चॅम्पियनशिपमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. तेव्हापासून तिने खऱ्या अर्थाने या खेळात गती घेतली. आतापर्यंत मितालीने 4 आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्त्व केले आहे. त्यापैकी 2020 मध्ये चीनमध्ये झालेल्या स्पर्धेत तिने कांस्यपदक जिंकले. यानंतर पुढच्या वर्षी रशियामध्ये झालेल्या स्पर्धेत तिने रौप्य पदक जिंकत भारताचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर उंचावले आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर शिक्षण –

बीकॉमनंतर तिने एक वर्ष मुंबईत नोकरीही केली. यानंतर तिच्या मनात शिक्षणाची आवड असल्याने तिने 2022-2023 दरम्यान, आयर्लंड देशातील त्रिनिटी कॉलेज डब्लिन येथे आंतरराष्ट्रीय व्यवस्थापन या विषयात मास्टर्सचे शिक्षण घेतले. सध्या ती तिच्या वडिलांच्या व्यवसायात त्यांना मदत करत असून आगामी काळात तिला खेळ आणि व्यवसाय दोन्हीमध्ये काम करायचे असल्याचे तिने यावेळी सांगितले.

दरम्यान, आतापर्यंतच्या तिच्या या यशात तिला तिचे प्रशिक्षक सोपान कटके, तिचे आजोबा रमेश शंकर वाणी, वडील मिलिंद वाणी, आई भारती आणि बहिण दिशीता यांचा मोठा पाठिंबा मिळाल्याचे तिने सांगितले.

हेही पाहा : UPSC Yogesh Patil Success Story : जळगावच्या 26 वर्षांच्या तरुणाचं UPSC परिक्षेत घवघवीत यश 

बातमी शेअर करा !
Share
Tags: devendra fadnavispachorapunesamnersportssuccess storywushu

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

“….तोपर्यंत राज ठाकरे-उद्धव ठाकरे यांची युती-आघाडी होऊ शकत नाही!”, भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांचा दावा

“….तोपर्यंत राज ठाकरे-उद्धव ठाकरे यांची युती-आघाडी होऊ शकत नाही!”, भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांचा दावा

October 13, 2025
विशेष मालिका: किस्से राजभवनाचे – लेख सातवा | कीर स्टार्मर – मोदी भेटीनिमित्त राजभवनाच्या कथा

विशेष मालिका: किस्से राजभवनाचे – लेख सातवा | कीर स्टार्मर – मोदी भेटीनिमित्त राजभवनाच्या कथा

October 13, 2025
तनवीर गाजी आणि श्रीनिवास पोखले यांच्या विशेष उपस्थितीत विदर्भ चित्रपट महोत्सव 2025 संपन्न

तनवीर गाजी आणि श्रीनिवास पोखले यांच्या विशेष उपस्थितीत विदर्भ चित्रपट महोत्सव 2025 संपन्न

October 13, 2025
गोव्यात खरी समावेशकता कशी दिसते, हे जगाला पर्पल फेस्टच्या माध्यमाने दाखवले – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

गोव्यात खरी समावेशकता कशी दिसते, हे जगाला पर्पल फेस्टच्या माध्यमाने दाखवले – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

October 13, 2025
जिल्हा परिषद-पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी गट-गणानुसार आज आरक्षण होणार जाहीर; इच्छुकांचे सोडतीकडे लक्ष

जिल्हा परिषद-पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी गट-गणानुसार आज आरक्षण होणार जाहीर; इच्छुकांचे सोडतीकडे लक्ष

October 13, 2025
National Coconut Conference : गोव्याच्या नारळ उत्पादन क्षेत्राला बळकटी देण्यासाठी महत्त्वाचे पाऊल

National Coconut Conference : गोव्याच्या नारळ उत्पादन क्षेत्राला बळकटी देण्यासाठी महत्त्वाचे पाऊल

October 11, 2025
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page