काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा यावेळी विधानसभा निवडणूक पराभव झाला. शिवसेना शिंदे गटाचे उमदेवार अमोल खताळ यांनी त्यांचा पराभव केला. शेतकरी पूत्र अमोल खताळ यांनी पहिल्यांदाच विधानसभेची निवडणूक लढवली आणि ते पहिल्यांदाच आमदार झाले. यानंतर नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी आमदार अमोल खताळ यांची सुवर्ण खान्देश लाईव्हच्या टीमने विशेष मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी आपल्या विजयाचा अनुभव सांगत आगामी काळातील मतदारसंघाचे व्हिजनही सांगितले.