मुंबई, 14 सप्टेंबर : दुबईत आयोजित आशिया कप स्पर्धेत आज भारत विरूद्ध पाकिस्तान यांच्यात सामना पार पडणार आहे. पहलगाम हल्ल्यानंतर दोन्ही देशांतील तणात वाढल्यानंतर पहिल्यांदाच भारत-पाक सामना होतोय. दरम्यान, अनेक विरोधी पक्षांनी या सामन्याला विरोध दर्शवला असून सोशल मीडियावरही बहिष्काराची मागणी होत आहे. अशातच आता ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मोठा गौप्यस्फोट करत जय शहा तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केलीय.
संजय राऊत काय म्हणाले? –
खासदार संजय राऊत यांना भारत-पाक सामन्याबाबत विचारले असता ते म्हणाले की, भारतीय क्रिकेट संघालाही हा सामना खेळायचा नाही. पण, त्यांच्यावर जय शाहांचा दबाव आहे. काही क्रिकेटपटूंशीआम्ही बोललो. मात्र, त्यांची मजबुरी आहे. दरम्यान, अनेक माजी क्रिकेटपटूंनी यावर भाष्यही केलं. माजी क्रिकेट यावर मत व्यक्त केलेय. पण जय शाहांचा यावर दबाव आहे, असा गौप्यस्फोट संजय राऊतांनी केला.
View this post on Instagram
‘जय शाह यांचा इंटरेस्ट यात गुंतलेला’ –
यापुर्वी दहशतवाद, श्रीलंका आणि पाकिस्तान अशा अनेक ठिकाणाहून आंतरराष्ट्रीय सामन्यातून भारताने माघार घेतली आहे आणि हे काही नवीन नाही. पण, जय शाह यांचा इंटरेस्ट यात गुंतलेला आहे. जय शाह हे दुबईत आहेत. पण, ते आजच्या सामन्याला जाणार नाही, हे कितीतरी मोठे उपकार त्यांनी केलेले आहेत. तुम्ही सामना आयोजित केलेला असून तुम्ही प्रमुख आहात. नरेंद्र मोदी यांना राष्ट्रभक्तीबद्दल कोणतीही नैतिकता राहिलेली नाही तसेच त्यांच्या अंधभक्तांनाही, अशी टीकाही संजय राऊतांनी केलीय.
‘भाजपचा राष्ट्रवाद हे सर्वात मोठे ढोंग’ –
दरम्यान, ज्या रेस्टॉरंटमध्ये हे सामने दाखवले जातील, त्यांची नावे सार्वजनिक केली जातील आणि लोकांपर्यंत पोहोचवली जातील. भारत विरूद्ध पाकिस्तान क्रिकेट सामन्यांची तिकिटे विक्री होत नाही. पण गॅम्बलिंग तसेच मनी लाँन्ड्रिंग होणार आहे. जय शाह दुबईत बसलेले आहेत. मोदींची अशी काय मजबुरी आहे की, त्यांना भारत पाकिस्तान सामना त्यांना खेळवावा लागत आहे. आजच्या भारत पाकिस्तान सामन्यावरील लक्ष विचलित व्हावं, म्हणून मोदी मणिपूरला गेले. दरम्यान, भाजपचा राष्ट्रवाद हे सर्वात मोठे ढोंग आहे, अशी टीकाही खासदार राऊतांनी केलीय.