संदीप पाटील, प्रतिनिधी
पारोळा, 9 मार्च : महाशिवरात्री व जागतिक महिला दिनानिमित्ताने शुक्रवार, 8 मार्च 2024 रोजी सौ. किरण चंद्रकांत पाटील यांच्या संकल्पनेतून महिला सशक्तीकरणासाठी महिलांसाठी स्वतंत्र व्यासपीठ “सन्मान नारी शक्तीचा” या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमात महाआरती, प्रसाद वाटप, गणेश वंदन, शिवतांडव,नृत्य व वत्कृत्व स्पर्धा, आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. तसेच विविध स्तरावर कार्यरत असलेल्या 11 महिलांचा शाल, बुके व पैठणी देऊन सत्कार करण्यात आला.
55 विद्य्यार्थी व विद्यार्थीनींनी नृत्र व वत्कृत्व स्पर्धेत सहभाग घेतला. त्या सर्व विद्यार्थ्यांना वाटर बॅग बक्षिस देण्यात आली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी राजे संभाजी मित्र मंडळ, दादासाहेब चंद्रकांत पाटील मित्र परिवार यांचे सहकार्य लाभले.
हेही वाचा : पारोळा येथे महाशिवरात्रनिमित्त हर हर महादेवाच्या गजरात पालखी सोहळा