• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

Accident News : टिप्परनं घेतला सरपंचाचा जीव, भीषण अपघातात जागीच मृत्यू

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
January 12, 2025
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
Beed Accident News

Accident News : टिप्परनं घेतला सरपंचाचा जीव, भीषण अपघातात जागीच मृत्यू

बीड – महाराष्ट्रात बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून वातावरण तापले आहे. यातच आता आणखी एका सरपंचाचा मृत्यू झाला आहे. बीड जिल्ह्यातील परळी धर्मापुरी मार्गावरील मिरवट फाट्यावर राखीची वाहतूक करणाऱ्या टिप्परने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात सरपंचाचा मृत्यू झाला आहे. अभिमन्यू क्षीरसागर असे मृत सरपंच यांचे नाव आहे. ते बीड जिल्ह्यातील सौंदाना गावचे सरपंच होते.

नेमकं काय घडलं –

मिळालेल्या माहितीनुसार, सरपंच अभिमन्यू क्षीरसागर हे परळीवरून शनिवारी रात्री साडेआठ वाजता काम आटपून दुचाकीने गावाकडे निघाले होते. यावेळी मिरवट येथे त्यांच्या दुचाकीला टिप्परने धडक दिली. या धडकेत अभिमन्यू क्षीरसागर हे रस्त्याच्या कडेला जाऊन पडले. ही धडक इतकी भीषण होती की, या धडकेत त्यांचा त्यांचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान, सरपंच क्षीरसागर यांच्या मृत्यूची माहिती कळताच परिसरातील नागरिकांनी एकच गर्दी केली होती. यानंतर सरंपच क्षीरसागर यांचा मृतदेह परळी येथील जिल्हा रुग्णालयात शवविछेदन करण्यासाठी पाठवण्यात आला. बीडमधील राखेचे अवैध व्यवसाय होत असल्याचे आरोप होत असताना सरपंचाचा अपघाती मृत्यू झाला आहे. अभिमन्यू क्षीरसागर यांच्या अपघाती मृत्यूबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. हा टिप्पर कोणाच्या मालकीचा आहे, याचादेखील तपास पोलिसांच्या वतीने केला जात आहे.

हेही वाचा – रवींद्र चव्हाणांना भाजपकडून मोठी जबाबदारी, आता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती, अशी आहे त्यांची कारकिर्द

बातमी शेअर करा !
Share
Tags: accident newsbeed accidentbeed newsroad accident

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

“शेतकऱ्याची पाटी कोरी झाली पाहिजे अन् त्याला……..!” कर्जमाफीनंतर महायुती सरकारचा आणखी एक मोठा निर्णय

“शेतकऱ्याची पाटी कोरी झाली पाहिजे अन् त्याला……..!” कर्जमाफीनंतर महायुती सरकारचा आणखी एक मोठा निर्णय

July 15, 2026
पंढरीच्या वाटेवर वारकऱ्यांना चालण्याचे बळ देणारा मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचा ‘चरणसेवा उपक्रम’

पंढरीच्या वाटेवर वारकऱ्यांना चालण्याचे बळ देणारा मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचा ‘चरणसेवा उपक्रम’

July 15, 2026
शेतकऱ्यांना मोठा दिलासा; ज्वारी खरेदीची मुदत वाढली, किमान आधारभूत किमतीवर ज्वारी विक्रीची आणखी संधी

शेतकऱ्यांना मोठा दिलासा; ज्वारी खरेदीची मुदत वाढली, किमान आधारभूत किमतीवर ज्वारी विक्रीची आणखी संधी

July 15, 2026
VIDEO | पावसाळी अधिवेशनात पाचोरा-भडगाव मतदारसंघाला काय मिळालं?; आमदार किशोर आप्पा पाटील यांनी दिली महत्वाची माहिती

VIDEO | पावसाळी अधिवेशनात पाचोरा-भडगाव मतदारसंघाला काय मिळालं?; आमदार किशोर आप्पा पाटील यांनी दिली महत्वाची माहिती

July 15, 2026
‘एसटी’ डेपोच्या पुनर्विकासातून महामंडळाला सक्षम करण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

‘एसटी’ डेपोच्या पुनर्विकासातून महामंडळाला सक्षम करण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 15, 2026
Jalgaon News: ग्रामीण पशुधन उद्योजकतेबाबत 16 जुलै रोजी कार्यशाळा

Jalgaon News: ग्रामीण पशुधन उद्योजकतेबाबत 16 जुलै रोजी कार्यशाळा

July 14, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page