ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 28 सप्टेंबर : जळगाव जिल्ह्यात लाचखोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असताना पाचोरा तालुक्यात लाचलुचपत विभागाने मोठी कारवाई केली आहे. पाचोरा तालुक्यातील खळकदेवळा येथील सरपंच तसेच त्यांच्या पंटरला आवास योजनेत मंजूर घरकूल नावावर करण्यासाठी 10 हजारांची लाच घेताना लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पडकले. याप्रकरणी सरपंच अनिल विश्राम पाटील (वय 46) आणि त्याच पंटर बलराम हेमराज भिल (वय 46 रा. खळकदेवळा) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.
काय आहे संपुर्ण प्रकरण? –
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे खळकदेवळा बुदूर्कू येथील रहिवासी असून त्यांचे आवास योजनेत घरकूल मंजूर झाले होते. मात्र, ते राहत असलेल्या जागेला नमूना आठ अ मध्ये नावे लावण्यात आलेले नव्हते. ते काम ग्रामसेवक यांच्याकडून करून घेण्याचा मोबदल्यात सरपंच यांनी दहा हजार रूपयांची लाचेची मागणी केली होती.
दरम्यान, तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे यांसंबंधीची तक्रार दिली. दहा हजार रूपयांची रक्कम सरपंचाने त्याच्या पंटरकडे देण्यास सांगितले. यानंतर शुक्रवार 27 सप्टेंबर रोजी लाचलुचपत विभागाने सापळा रचत पंटरने लाच स्विकरताच रंगेहाथ पकडले. दरम्यान, याप्रकरणी सरपंच आणि त्याचा पंटर यास अटक करण्यात आली आहे.
यांनी केली कारवाई –
सदर कारवाई जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्यासह, पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे, पोलीस उपनिरीक्षक दिनेशसिंग पाटील, पोलीस निरीक्षक नेत्रा जाधव पोकॉ राकेश दुसाने, पोहेकॉ,रविंद्र घुगे,सुनिल वानखेडे शैला धनगर, पोना किशोर महाजन , बाळू मराठे , पोकॉ ,प्रणेश ठाकुर, अमोल सुर्यवंशी यांनी केली.
हेही पाहा : Jalgaon जिल्ह्यातील एमरजन्सी लोडशेडिंग कधी बंद होणार?, IAS Ayush Prasad Exclusive Interview