पाचोरा, 27 जानेवारी : पाचोरा तालुक्यातील लासगाव येथील जिल्हा परिषदेतील शाळेत देशाचा 76 वा प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ध्वजारोहणानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात शाळेतील पदवीधर शिक्षिका प्रणिता मोहन परदेशी यांचा सरपंच रामसिंग उद्देसिंग खैरनार (समाधान पाटील) यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
लासगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक विद्यामंदिर शाळेत सहशालेय उपक्रम, क्रीडास्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच विद्यार्थ्यांच्या विविध उपक्रमासाठी सहभाग घेणाऱ्या पदवीधर शिक्षिका प्रणिता मोहन परदेशी यांचा ग्रामपंचायत सरपंच रामसिंग उद्देसिंग खैरनार (समाधान पाटील) यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी जिल्हा परिषद मराठी तसेच उर्दू शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक तसेच विद्यार्थी यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, शालेय शिक्षण समिती अध्यक्ष, सदस्य आणि गावातील नागरिक उपस्थित होते.