अजंग (मालेगाव), 18 एप्रिल : राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भूसे यांनी मालेगाव तालुक्यातील अजंग येथील जिल्हा परिषद शाळेच्या शैक्षणिक डेस्कसह शाळेच्या बॅगचे वितरण समारंभाला उपस्थिती लावली. दरम्यान, या कार्यक्रमात मंत्री दादा भूसे यांनी मोठा घोषणा करत राज्यातील शिक्षकांना लवकरच ड्रेस कोड लागू करणार असल्याचे सांगितले.
View this post on Instagram
मंत्री दादा भूसे काय म्हणाले? –
मंत्री दादा भूसे म्हणाले की, मला अजंग गावाच्या शाळेचे तसेच येथील शिक्षकांचे अभिनंदन करायचंय. कारण, तुम्ही सर्व शिक्षक-शिक्षिका हे एकाच गणवेशात आहेत. यामुळे तुमचा आदर्श घेऊन आपण राज्यव्यापी ड्रेस कोड करणार आहोत. अर्थात आता राज्यातील सर्व शिक्षकांना सुद्धा एकाच गणवेशात यावे लागणार आहे. दरम्यान, खारीचा वाटा म्हणून शासनाकडून निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशीही घोषणा दादा भूसे यांनी केलीय.
शिक्षकांना ड्रेस लागू करण्याची केली घोषणा –
राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भूसे यांनी मालेगाव तालुक्यातील अजंग येथील जिल्हा परिषदेतील शाळेचे शिक्षक-शिक्षिका हे एकाच गणवेशात होते. दरम्यान, शालेय शिक्षणंत्री दादा भूसे यांनी त्याठिकाणी आयोजित केलेल्या कार्यक्रमात आल्यानंतर अजंग शाळेच्या शिक्षकांची ड्रेस कोडची दखल घेतली. यावरूनच आता राज्यातील सर्व शिक्षकांना ड्रेस कोड लागू होणार असल्याची घोषणा मंत्री दादा भूसे यांनी केली. यामुळे लवकरच विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकही आता गणवेशात दिसणार आहेत.
शालेय शिक्षणमंत्र्यांची अजंग शाळेतील कार्यक्रमात उपस्थिती –
मालेगाव तालुक्यातील अजंग येथील जिल्हा परिषद शाळेत लाभार्थी विद्यार्थ्यांना “शैक्षणिक डेस्कसह शाळेच्या बॅगचे वितरण समारंभ” संपन्न झाला. या कार्यक्रमाला राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भूसे यांनी उपस्थिती लावली. हा कार्यक्रम कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) अंतर्गत, ONGC व अवंत फाउंडेशनच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला होता. यावेळी शिक्षण व विद्यार्थ्यांच्या उत्तम आरोग्यासाठी शैक्षणिक डेस्कसह शाळेच्या बॅगचे वितरण करण्यात आले.
हेही वाचा : Beed Crime : बीडमध्ये वकिल महिलेला मारहाण; 10 जणांविरोधात गुन्हा दाखल, काय आहे संपुर्ण प्रकरण?