ईसा तडवी, प्रतिनिधी
वडाळा वडाळी (चाळीसगाव) – वडाळा येथील बेलगंगा प्रतिष्ठान संचलित साने गुरुजी माध्यमिक विद्यालयाच्या 2000च्या इयत्ता दहावीच्या माजी विद्यार्थ्यांच्या विद्यार्थी स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. विद्यालयाच्या प्रांगणात हा स्नेह मेळावा पार पडला. सर्व माजी विद्यार्थ्यांनी मिळून या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
रविवारी 29 डिसेंबर 2024 रोजी पार पडलेल्या या मेळाव्याच्या अध्यक्ष स्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी केंद्रीय ग्रामविकास मंत्री एम. के. पाटील होते. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक आर. सी. पाटील, 200 बॅचचे मुख्याध्यापक के. ए. सोनवणे तसेच त्या बॅचचे सर्व शिक्षक एस. एस. पाटील, सौ. एस. एस. पाटील, आर. डी. पाटील, आर. डी. पाटील, पी. बी. पाटील, परदेशी सर, संस्थेचे विद्यमान मुख्याध्यापक आढाव सर आणि लोकमत आदर्श शिक्षक पुरस्कार मिळवणारे डी. एन. पाटील तसेच हेमराज पाटील, संस्थेचा त्या काळातील असलेला संपूर्ण स्टाफ, सर्जेराव आप्पा, रमेश अण्णा पाटील व सध्या कार्यरत असलेले विजय निंब आमले आदी मान्यवर उपस्थित होते. यासोबतच त्या बॅचच्या शाळेतील शिक्षकच नव्हे तर ज्या ठिकाणी हे विद्यार्थी ते क्लासेसला जात होते, त्या क्लासेसचे शिक्षक दिलीप जैन हे सुद्धा आवर्जून उपस्थित होते.
जुन्या काळातील असलेल्या आपल्या आठवणींना उजाळा देण्यासाठी व ज्या शाळेमध्ये आपण विद्या घेतली, शिकून सुसंस्कृत झालो व ज्या शिक्षकांमुळे आपण घडलो त्या शिक्षकांबद्दल एक कृतज्ञता म्हणून हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यात विद्यार्थ्यांनी सर्व आठवणींना उजाळा देत व हसत खेळत कार्यक्रम पार पडला.
सर्वात आधी गावातील रेणुका माता मंदिरावर नारळ वाढवून आणि आणि यानंतर शाळेत सरस्वती पूजन आणि दीप प्रज्वलनाने या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमात सर्व शिक्षकांनी एका दिवसाची शाळा भरवुन विद्यार्थ्यांना गणित, हिंदी व इंग्लिश याचे धडेही दिले. तसेच सर्वांनी आपापले त्या काळातील झालेले प्रसंग व भावना या सर्वांना त्यांनी वाट करून दिली तसेच शिक्षकांनी सुद्धा त्यांनी शिकवलेल्या व घडलेल्या प्रसंगाबाबत मागोवा घेतला व सर्वांनी आपापले विचार मांडून व सुरुची भोजनाचा आस्वाद घेऊन कार्यक्रम पार पाडला.
दिवंगत समाधान पतंगराव आमले आणि दिवंगत विजय रमेश अहिरराव हे दोन माजी विद्यार्थी काळाच्या ओघात पडद्याआड झाले त्यांच्या स्मृतींना या ठिकाणी उजाळा देण्यात आला. यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन या शाळेचे 2000 बॅचचे विद्यार्थी नरेंद्र अहिराव यांनी केले. तर आभार प्रदर्शन हे श्री मनोज अहिरराव यांनी केले.