• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

विख्यात शिल्पकार राम सुतार यांना राज्य सरकारचा सर्वोच्च नागरी सन्मान असणारा  ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार प्रदान

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
November 15, 2025
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
विख्यात शिल्पकार राम सुतार यांना राज्य सरकारचा सर्वोच्च नागरी सन्मान असणारा  ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार प्रदान

नवी दिल्ली, 14 नोव्हेंबर : विख्यात शिल्पकार राम सुतार यांनी शिल्पांच्या माध्यमातून महाराष्ट्रासह देशाचा नावलौकिक जगभरात वाढविला आहे. त्यांनी घडविलेली शिल्पे इतिहासाची साक्षीदार असून त्यातून अभिव्यक्त होणारा वारसा शेकडो वर्ष अबाधित राहील, या शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिल्पकार राम सुतार यांचा गौरव केला.

शिल्पकार राम सुतार यांना  राज्य सरकारचा सर्वोच्च नागरी सन्मान असणारा  ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार (2024) मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. नोएडा (उत्तर प्रदेश) येथील राम सुतार यांच्या निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रमास  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, खासदार महेश शर्मा, महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा,  महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्त व सचिव आर विमला, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे, अनिल सुतार आदी उपस्थित होते.

शिल्पकला क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल शिल्पकार राम सुतार यांना हा पुरस्कार देण्यात आला असून सन्मानचिन्ह, मानपत्र आणि 25 लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, राम सुतार यांनी घडविलेली शिल्पे अतिशय परिपूर्ण असून जगभरात ती दिमाखात उभी आहेत. त्यांच्या विविध कलाकृती त्यांच्यातील श्रेष्ठ कलाकाराची साक्ष देतात. राम सुतार  यांच्या जीवनातील शिल्पांचे महत्व अलौकिक असून त्यांच्या असामान्य सृजनशीलतेचा अविष्कार अनेक कलाकृतींमधून अनुभवयाला मिळतो. राम सुतार यांच्या मनात महाराष्ट्र असून त्याची प्रचिती पुरस्कार प्रदान करतेवेळी त्यांनी केलेल्या महाराष्ट्राच्या जयघोषातून आली. राम सुतार यांच्यामुळे महाराष्ट्र भूषण पुरस्काराची उंची वाढली असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, की राम सुतार यांनी केवळ देशातच नव्हे तर जगभर शिल्पे उभारली आहेत. देशाचे स्टॅच्यूमॅन अशी त्यांची ओळख असून अनेक उंच पुतळे उभारणाऱ्या राम  सुतार यांच्यामुळे पुरस्काराचीच उंची वाढली आहे. प्रतिभावान ऋषीतुल्य व्यक्तिमत्व असलेले राम सुतार हे मराठी माणसाचा मानबिंदू आहेत.

महाराष्ट्र आणि देशाने राम सुतार यांच्या श्रेष्ठ कलेची अनुभूती घेतली असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, की  राम सुतार हे महाराष्ट्राचा अभिमान असून त्यांचे या क्षेत्रातील योगदान अतुलनीय आहे. त्यांनी निर्मिलेला भारतरत्न  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा इंदू मिल येथील स्मारकामध्ये उभारण्यात येणार आहे.

सुतार परिवाराच्या वतीने अनिल सुतार यांनी मनोगतात या सन्मानाबद्दल महाराष्ट्र सरकारचे आभार मानले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राम सुतार यांच्या प्रकृतीची विचारपूस करुन सुरु असलेल्या उपचारांची माहिती घेतली. यावेळी  स्वाती सुतार, सोनाली सुतार, समीर सुतार, दिवाकर शर्मा, कुलदीप मित्तल यांसह विविध अधिकारी आणि  सुतार कुटुंबातील सदस्य यावेळी उपस्थित होते.

हेही वाचा : Bihar Election Result : एनडीए गठबंधनची बिहारमध्ये एकहाती सत्ता; कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या, वाचा एका क्लिकवर

बातमी शेअर करा !
Share
Tags: maharashtra bhushanmaharastra governmentmarathi newsram sutarsuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ZP CEO करिश्मा नायर यांच्या संकल्पनेतून जिल्हाभर भव्य स्वच्छता अभियान; जिल्हाधिकारी रोहन घुगे व शिक्षणाधिकारी निलेश पाटील यांचा प्रत्यक्ष सहभाग

ZP CEO करिश्मा नायर यांच्या संकल्पनेतून जिल्हाभर भव्य स्वच्छता अभियान; जिल्हाधिकारी रोहन घुगे व शिक्षणाधिकारी निलेश पाटील यांचा प्रत्यक्ष सहभाग

August 29, 2026
विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक, कौशल्याधारित व रोजगाराभिमुख शिक्षण देण्याच्या दिशेने विद्यापीठाची वाटचाल – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक, कौशल्याधारित व रोजगाराभिमुख शिक्षण देण्याच्या दिशेने विद्यापीठाची वाटचाल – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

August 29, 2026
‘तेहतीस कोटि ईश्वर मंदिरा’चे उद्या भूमिपूजन; चाळीसगाव तालुक्यातील खडकी सीम येथे 100 कोटींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प

‘तेहतीस कोटि ईश्वर मंदिरा’चे उद्या भूमिपूजन; चाळीसगाव तालुक्यातील खडकी सीम येथे 100 कोटींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प

August 29, 2026
‘…..हा अखेरचा लढा, आता माघार नाही’, अंतरवली सराटीत मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला सुरूवात

‘…..हा अखेरचा लढा, आता माघार नाही’, अंतरवली सराटीत मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला सुरूवात

August 29, 2026
सिंहस्थ महाकुंभची सर्व कामे वेळेतच पूर्ण करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

सिंहस्थ महाकुंभची सर्व कामे वेळेतच पूर्ण करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

August 29, 2026
कुंभमेळ्यावर आधारित छायाचित्र प्रदर्शनाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

कुंभमेळ्यावर आधारित छायाचित्र प्रदर्शनाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

August 29, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page