नवी दिल्ली, 12 सप्टेंबर : गेल्या महिनाभरापासून ज्येष्ठ माकप नेते सिताराम येच्युरी यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, आज त्यांनी वयाच्या 72 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून दिल्लीतील एम्स रुग्णालयात ते अतिदक्षता विभागात होते.
सीताराम येच्युरी यांचा राजकीय प्रवास –
सीताराम येच्युरी यांचा सन 1974 मध्ये भारतीय विद्यार्थी महासंघात अर्थात एसएफआय मध्ये सहभागी झाल्यापासून राजकीय प्रवास सुरु झाला. 1975 साली येच्युरी सीपीआय(एम) चे सदस्य बनले आणि आणीबाणीच्या काळात लवकरच त्यांना अटक करण्यात आली. ज्यामुळे राजकारणात त्यांचा सक्रिय सहभाग सुरू झाला. राष्ट्रीय मोर्चा आणि संयुक्त मोर्चाच्या काळात आघाडी सरकारांना पाठिंबा देण्यासाठी त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या हरकिशन सिंह सुरजीत सारख्या वरिष्ठ नेत्यांकडून अनेक गोष्टी शिकत त्यांनी आपला राजकीय प्रवास सुरु ठेवला. यामुळे त्यांचा हा प्रवास पक्षाच्या सरचीटणीस पदापर्यंत घेऊन गेला.
पहिल्या युपीए सरकार 2004-2009 च्या दरम्यान पक्षाच्या भूमिकेला आकार देण्यात येचुरी यांचे नेतृत्व महत्त्वपूर्ण होते. भारत-अमेरिका अणु कराराबाबत सरकारशी झालेल्या वाटाघाटींमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. या मतभेदामुळे डाव्या पक्षांनी युपीएआय सरकारचा पाठिंबा मागे घेतला.
सिताराम येच्युरी यांचा मूळचा जन्म तमिळनाडुतील मद्रासमधील आहे. आयुष्यभर त्यांनी कम्युनिष्ट पक्षाचे काम मोठ्या जोमाने केले. विशेष म्हणजे भारतात कम्युनिष्ट पक्षाच्या वाढीचा आणि पक्षाला उतरती कळा लागण्याचा काळही येच्युरी यांनी पाहिला. तसेच सध्याच्या काळाच्या त्यांनी केरळमधील सरकारमध्येही महत्वाची भूमिका बजावली होती. दरम्यान, सिताराम येच्युरी यांच्या जाण्याने कम्युनिष्ट पक्षाने बुद्धीवादी चेहरा गमावल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.
हेही पाहा : Video : ओळख प्रशासनाची, प्रांताधिकारी पदाच्या जबाबदाऱ्या काय, त्यांचं कामकाज कसं चालतं?