मुंबई – राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तब्येत बरी नसल्याने त्यांनी ज्युपिटर रुग्णालयात दाखल होत तपासणी केली. एकीकडे एकनाथ शिंदे यांची प्रकृती खालावली असल्याची माहिती समोर आली. तर दुसरीकडे ते महायुतीच्या सरकारमध्ये शिवसेनेला गृहमंत्रीपदा मिळावे म्हणून अडून बसले आहे, असेही बोलले जात आहे. या सर्व प्रश्नांवर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते गुलाबराव पाटील यांनी महत्त्वाची माहिती दिली.
काय म्हणाले गुलाबराव पाटील –
मुंबई माध्यमांशी बोलताना शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील म्हणाले की, दरेगाववरुन आल्यापासून ते आजारी आहेत. त्यांना घशाचा संसर्ग झाला आहे. त्यांना अशक्तपणा आहे. संपूर्ण महाराष्ट्रात त्यांनी दौरे केले असल्याने त्यांना डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे. त्याच आधारावर डॉक्टरांनी त्यांना काही चाचण्या करण्यास सांगितल्याने ते ज्यूपिटर रुग्णालयात गेले. त्यामुळे नाराजीचा विषय नाही, असे गुलाबराव पाटील यांनी सांगितले.
व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://youtube.com/shorts/QoqaiztvHSs?si=oVhK3utmnnib653Chttps://www.youtube.com/@suvarnakhandeshlivenews/videos
त्यांना सर्दी, खोकला, ताप आहे. त्यामुळे त्यांना एमआरआय करण्याचा आणि रक्ततपासणी करण्याचा सल्ला दिल्याचे मला माहिती पडले आहे. ते करणे त्यांना गरजेचे आहे. शेवटी तब्येत हा विषय सर्वात महत्त्वाचा आहे. पण कुणी त्याचा अर्थ चुकीचा काढत असेल, तर मला वाटतं ते योग्य नाही, असेही गुलाबराव पाटील म्हणाले.
मागच्या आठवड्यात एकनाथ शिंदे यांना सर्दी, खोकला, तापाचा आजार झाला होता. त्यातून ते बरे झाले. मात्र, त्यांना अजून थोडा थकवा जाणवत असल्याने नियमित वैद्यकीय चाचणी करण्याचा सल्ला त्यांना डॉक्टरांनी दिला. त्या सल्ल्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे है ज्युपिटर हॅास्पिटल येथे दाखल झाले आहे आणि वैद्यकीय तपासणी केली.
ज्यूपिटरचे डॉक्टरांनी काय सांगितलं –
साहेबांना थोडा ताप आला होता. त्यांना अशक्तपणा आला आहे. संसर्गाच्या तपासणीसाठी आले होते. त्यांचा एमआरआय करण्यात आला आहे, अशी माहिती डॉक्टरांनी दिली. तर या नियमित तपासणीनंतर एकनाथ शिंदे रुग्णालयातून बाहेर पडले.
सत्तास्थापनेकडे लक्ष –
23 नोव्हेंबरला महायुती सरकारने महाराष्ट्रात ऐतिहासिक असे यश मिळवल्यानंतर परवा 5 डिसेंबरला महायुती सरकारचा भव्यदिव्य असा शपथविधी सोहळा होणार आहे. 2022 मध्ये भाजपने मुख्यमंत्रिपद शिंदे गटाला दिले. त्यानंतर 2023 मध्ये महायुती सरकारमध्ये अजित पवारही सहभागी झाले. त्यानंतर आता 2024 मध्ये मिळालेल्या या यशानंतर महायुतीमध्ये शिंदे गटाला नेमकी कोणती मंत्रिपदे मिळतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Video : “सर सलामत तो पगडी हजार”, मुंबईत गुलाबराव पाटील नेमकं काय म्हणाले?