ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 29 फेब्रुवारी : पाचोरा येथे कुमावत बेलदार समाज सेवा संघाची वार्षिक सभा संपन्न झाली. कुमावत बेलदार समाज सेवा संघाचे संस्थापक, अध्यक्ष श्रीकांत परदेशी, प्रदेश अध्यक्ष प्रदीप कामे, प्रदेश सचिव भगवान कुमावत व जिल्हाध्यक्ष विनोद बापू कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली व रविंद्र नामदेव कुमावत यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली.
कुमावत बेलदार समाज सेवा संघाच्या वार्षिक सभेत पाचोरा तालुका नुतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. पाचोरा तालुका अध्यक्ष शांताराम (अण्णा) दगडू कुमावत, महीला आघाडी पाचोरा तालुका अध्यक्षा सौ. संगीता गजानन कुमावत, युवा अध्यक्ष विलास रतिलाल कुमावत तर महीला युवा अध्यक्षा सौ माधुरी नितीन कुमावत यांची सर्वानुमते निवड झाली.
पुरुष कार्यकारिणी कार्याध्यक्ष संजय कुमावत, सचिव अनिल कुमावत, सहसचिव योगेश रामभाऊ कुमावत, कोषाध्यक्ष दिलीय ओंकार कुमावत, सह कोषाध्यक्ष नारायण कुमावत, विभागीय उपाध्यक्ष सतीष कुमावत, नाना कुमावत, शरद बाळू कुमावत, पांडुरंग कुमावत, ज्ञानेश्वर दिनकर कुमावत, किशोर नारायन कुमावत, बाळू शंकर कुमावत, दिपक केशरलाल कुमावत व सदस्य भगवान अमृत कुमावत, शालीक दगडू कुमावत, प्रकाश नारायण कुमावत, शरद किसन कुमावत, ज्ञानेश्वर बळवंत कुमावत, कैलास विश्वनाथ कुमावत, मुकेश शामराव कुमावत, आदींनी उपस्थित राहत नुतन कार्यकारिणीचे अभिनंदन केले. यावेळी सुत्रसंचलन निलेश कुमावत व आभार नारायण कुमावत यांनी मानले.
हेही वाचा : आमदार किशोर पाटील यांच्या नेतृत्वात भाजपचे अमोल शिंदे व शरद पवार गट समर्थकांचा शिवसेनेत प्रवेश






