पुणे, 12 जून : लोकसभा निवडणुकीत अपेक्षित असे यश मिळल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी सरकारवर जोरदार टीका करायला सुरूवात केलीय. दरम्यान, शरद पवार यांनी पुण्यातील इंदापुर तालुक्यातील शेतकऱ्यांसोबत संवाद साधला. यावेळी शेतकऱ्यांनी शरद पवार यांच्यासोबत अनेक प्रश्न उपस्थित केल्याने चार महिने द्या, मला राज्य सरकार बदलायचंय, असे उपस्थित शेतकऱ्यांना सांगितले.
काय म्हणाले शरद पवार? –
इंदापुरात शरद पवार यांनी शेतकऱ्यांसोबत संवाद साधला. यावेळी शेतकऱ्यांनी शरद पवार यांच्यासमोर अनेक समस्या मांडल्या. तसेच सरकारच्या धोरणाविषयी प्रश्न उपस्थित केले. यावेळी चार-सहा महिने थांबा, मला राज्यातले सरकार बदलायचे आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सर्वांना रस्त्यावर उतरावे लागेल, असा विश्वास शरद पवार यांनी उपस्थितांना दिला.
शेतकऱ्यांसाठी कामे करू –
शरद पवार यांनी आज पुरंदर तालुक्याच्या कोळविहिरे येथे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी पवार म्हणाले की, तुम्ही चार-सहा महिने थांबा, मला राज्य सरकार बदलायचे आहे. हे सरकार बदलल्याशिवाय आपल्याला शेतकऱ्यांसाठी हवी तशी धोरणे राबवता येणार नाहीत. सरकार बदलल्यावर आपण शेतकऱ्यांसाठी कामे करू, असे आश्वासनही शरद पवारांनी उपस्थित शेतकऱ्यांना दिले.
हेही वाचा : 6 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करुन हत्या, जामनेर तालुक्यातील धक्कादायक घटना